आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओत एजंट हटले, वाहनधारक सुखावले, बदलाचे झाले स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार सोमवारपासून एजंटांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) प्रवेश बंदी करण्यात आली. यामुळे या कार्यालयात विविध कामांसाठी येणारे नागरिक एजंटांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीपासून मुक्त झाल्याने सुखावले. मात्र, पुरेशा मार्गदर्शनाचा अभाव आणि अर्जांचा तुटवडा यामुळे येथे आलेल्या काही जणांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला. प्रारंभी नागरिकांनी थोडा त्रास होणार असला तरीही, विभागाने दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले.

परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी कार्यालयातील एजंट अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंद करण्याचे आदेश काढले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात झाली. विविध प्रकारच्या प्रमाणपत्र आणि अनुज्ञाप्ती मिळण्यासाठी ऑनलाइन अर्जांची सुविधा करण्यात आली आहे. तरीही एजंटमार्फत अनेक कामे केली जात होती. यात आजवर गैरप्रकारही उघडकीस आले आहेत. पारदर्शक कामकाज आणि नागरिकांची आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी परिवहन आयुक्तांनी हा फतवा काढला आहे. सोमवारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करण्यात येऊन कार्यालयात प्रवेश देण्यात येत होता. एजंटांच्या संघटनेने प्रवेशद्वारावर ठिय्या देत या आदेशाचा निषेध केला. या विरोधात उच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे अजब उत्तर
"दिव्यमराठी'च्या प्रतिनिधीने आरटीओ कार्यालयातील एका खिडकीवर जाऊन तेथील इन्स्पेक्शन अर्ज मागितला असता, तेथील शिपायाने बाहेर झेरॉक्सच्या दुकानातून तो घेऊन येण्यास सांगितले.

मार्गदर्शन केंद्र स्थापणार
-नागरिकांनासध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी लवकरच मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येथे अर्ज भरण्यापासून कागदपत्रांसंबंधी सर्व माहिती दिली जाईल. जीवनबनसोड, प्रादेशिकपरिवहन अधिकारी

आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी कागदपत्रांची तपासणी करून वाहनधारकांना आत सोडले जात होते. या वेळी पाहणी करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड.