आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाड्यांची आता आरटीओकडून तांत्रिक तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घंटागाड्यांचीतांत्रिक तपासणी होत नसल्याने अपघातांची संख्या वाढल्याची बाब ‘दिव्य मराठी’ने सिडकोतील बालिकेच्या अपघाती मृत्यूनंतर निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत प्रादेशिक परिवहन विभागाने महापालिकेस नोटीस पाठविली आहे. यात ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचा संदर्भ देत महापालिकेकडील घंटागाड्या वा कचरा संकलन करणाऱ्या अन्य वाहनांची तपासणी संबंधित कार्यालयाकडून २२ सप्टेंबरपर्यंत करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

नेहा ठाकरे या नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा घंटागाडीखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० सप्टेंबरला सिडकोतील तानाजी चौकात घडली होती. या घटनेनंतर ‘दिव्य मराठी’ने महापालिकेच्या घंटागाड्यांची अवस्था मांडणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. घंटागाड्यांची फिटनेस तपासणीच होत नसल्याची बाब त्यात नमूद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, स्थायी समितीच्या सभेतही या विषयावर चर्चा झाली होती. घंटागाड्यांची फाटलेली चाके, निकामी झालेले ब्रेक आदी बाबी या निमित्ताने ठळकपणे पुढे आल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत प्रादेशिक परिवहन विभागाने महापालिकेला वाहन तपासणीविषयी नोटीस दिली आहे.