आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉइस नंबरसाठी तिप्पट शुल्क; ‘नंबर वन’साठी द्या 4 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कार, मोटारींवर पसंतीचा अथवा आकर्षक क्रमांक मिळवण्यासाठी आता तीनपट जादा शुल्क मोजावे लागणार आहे. अतिमहत्त्वाचा आणि शुभ समजल्या जाणार्‍या क्रमांकासाठी 1 लाखापासून ते 4 लाखांपर्यंतचे शुल्क परिवहन विभागाकडे भरावे लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलात भरीव वाढ होणार आहे.

चॉइस नंबरसाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पुढार्‍यांची आरटीओकडे कायमच गर्दी होते. एकाच क्रमांकासाठी चार-चार अर्ज येतात. अशा वेळी परिवहन अधिकार्‍यांची अडचण होते. काही वेळा क्रमांकाचा जाहीर लिलाव केला जातो. गेल्या वर्षी लागलेल्या बोलीत 50 हजाराचा क्रमांक तब्बल 5 लाख रुपयांना विकला गेला. यात पारदर्शकपणा आणण्यासाठी विभागाकडून ‘प्रथम येणार्‍यास प्राधान्य’ अशी पद्धत राबविण्यात आली. परिवहन विभागाने 15 मेपासून पसंती क्रमांकासाठीच्या शुल्क रचेनत बदल करून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. यामध्ये आता 0001 अथवा 1 क्रमांकासाठी 4 लाख रुपये शुल्क झाले आहे. याआधी ते 1 लाख रुपये होते. दुचाकीसाठी याच क्रमांकाला 25 हजारांऐवजी आता 50 हजार भरावे.

या नंबरसाठी 70 हजार

0111, 0222, 0333, 0444, 0555, 0666, 0777, 0888, 1111, 2222, 3333, 4444, 5555, 6666, 7777, 8888, तर याच नंबरसाठी दुचाकीला 15 हजार रुपये शुल्क भरावे लागेल. यापूर्वी 25 हजार शुल्क होते. 0002 ते 0011 पर्यंतच्या आतील क्रमांकांना आणि 0022 च्या पटीत व 1234, 1001, 1000, 1515, 1818, 2525, 2727, 3456, 5000, 5454, 5678, 6363, 7007, 7272, 9000, 9009, 8181, 9090 क्रमांकासाठी 50 हजार, तर दुचाकीसाठी 10 हजाराचे शुल्क भरावे लागणार आहे. क्रमांक मालिकेतील हजार क्रमांक उलटून पुढचा क्रमांक लागल्यास, त्यासाठी 7500, तर दुचाकीसाठी 4 हजारांचे शुल्क करण्यात आले आहे.

महसूल वाढेल तिप्पट
गेल्या वर्षभरात परिवहन विभागास आकर्षक क्रमांकांतून सुमारे 3 कोटी 50 लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. 5 हजार 637 वाहनधारकांनी आकर्षक क्रमांक घेतले आहेत. याच शुल्कात तब्बल तीन पटीने वाढ झाली. त्यामुळे विभागाच्या महसुलात भरीव वाढ होऊन 6 ते 8 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सुभाष पेडामकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी