आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारटीअाेच्याच वाहनाचे ४० रुपयांत बाेगस पीयूसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहनातून निघणाऱ्या धुरातील घातक वा-यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनिवार्य असलेल्या पीयूसी प्रमाणपत्राच्या नावाखाली पैसे कमावण्याचा धंदा कसा चालताे, याचे स्टिंग डी. बी. स्टार चमूने केले असून, काेणतीही खातरजमा करता वा प्रत्यक्ष वाहन समाेर नसताना चक्क प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसाेड यांच्या सरकारी वाहनाचा बाेगस पीयूसी अवघ्या ४० रुपयांत काढून दिला गेला. जादा पैसे माेजाल तर भंगारात गेलेल्या वाहनाचाही पीयूसी काढून देऊ, असे बिनधास्तपणे बेफिकीरपणे सांगण्यासही केंद्रचालक घाबरले नाहीत.
बाेगस पीयूसी प्रमाणपत्राविराेधात गेल्या अाठवड्यात प्रादेशिक परिवहन विभागाने उघडलेल्या माेहिमेत १० पीयूसी केंद्रांचा दाेन महिन्यांसाठी परवाना िनलंबित करण्यात अाला. बाेगस पीयूसी प्रमाणपत्रामुळे पर्यावरणाला घातक वायूंचे उत्सर्जन वाढत असल्याच्या तक्रारी हाेत्या. त्यामुळे बनसाेड यांनी दखल घेत कारवाई केल्याची बाब स्वागतार्हच हाेती. मात्र, या धंद्यात पैसे कमावण्याचा नाद लागलेल्या केंद्रचालकांचे डाेळे उघडले नसल्याचे डी. बी. स्टारच्या स्टिंगमध्ये उघड झाले. त्यातून वाहन नसताना बनसाेड यांच्याच सरकारी वाहन क्रमांक एम.एच. ०४, ए.क्यू. ०७७७ या चारचाकी वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र दिले.

अारटीअाेच्या एम.एच. ०४, ए.क्यू. ०७७७ या वाहनाचे बाेगस पीयूसी डी.बी. स्टार चमूने पीयूसी केंद्रातून काढले.
परवाना कायमस्वरूपी रद्द करणार
शहरातीलपीयूसी केंद्रांमधून बाेगस पीयूसी दिल्याचा पुरावा मिळाला तर संबंधित केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले जातील. बाेगस पीयूसी देत पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या वायूंबाबत बेफिकिरी झाल्याचे अाढळल्यास संबंधितांवर कठाेर कारवाई केली जाईल. जीवनबनसाेड, प्रादेशिक परिवहन अधिकारी
फोटो - डी. बी. स्टारच्या चमूने केलेल्या स्टिंगमध्ये पीयूसी केंद्रावरून अारटीअाेच्या वाहनाचे काढलेले बाेगस पीयूसी.
पुढील स्लाईडवर इतर फोटो..