आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ विभागाच्याच वाहनाचा ४० रुपयांत बोगस पीयूसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मोटार वाहन नियमाप्रमाणे वाहनाची प्रदूषण पातळी तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी परिवहन विभागाने शहरात ३२ पीयूसी केंद्रांना अधिकृत मान्यता दिली आ. यातील केंद्रांवर जाऊन दुचाकी, चारचाकी वा अवजड वाहनांनी सायलेन्सरमधून निघणाऱ्या धुराची ठराविक कालावधीनंतर तपासणी करणे अपेक्षित आ. अशा केंद्रांवर काेणतीही तपासणी करता सर्रासपणे पीयूसी प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या तक्रारी हाेत्या. कर्मचारी केवळ गाडीचा क्रमांक बघून त्यास हातानेच पावती देऊन प्रमाणपत्र देत असल्याचे चित्र हाेते. त्या बदल्यात वाहन नसले तरी चालेल, मात्र जादा पैसे माेजले की प्रमाणपत्र मिळत हाेते. िवशेष म्हणजे, या प्रमाणपत्रावरील अावश्यक माहितीदेखील भरण्यात कर्मचारी िदरंगाई करीत हाेते.


कारवाईनंतरही पीयूसी केंद्रांवर जरब नाहीच...
वास्तविकपीयूसी केंद्रामध्ये वाहनांची तपासणी करून त्यातील धुरामध्ये कार्बन मोनाक्साइड, हायड्रोकार्बन, घनता यांचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त नाही ना, याची तपासणी करूनच पीयूसी देणे बंधनकारक आ. ही बाब लक्षात अाल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या अाठवड्यात माेहीम राबवून दहा केंद्रांचा परवाना दोन महिन्यांसाठी निलंबित केला. कारवाईनंतर तरी पीयूसी केंद्रांवर जरब बसेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, 'डी.बी. स्टार'ने या केंद्रांना भेटी िदल्यानंतर हा गाेरखधंदा राजराेसपणे सुरूच असल्याचे समाेर अाले. कोणतीही तपासणी करता केंद्रचालकाने पावतीवर गाडीचा क्रमांक लिहिला हाताने अंदाजेच कार्बन मोनाक्साईड हायड्रोकार्बनची टक्केवारी लिहून प्रमाणपत्र प्रतिनिधीच्या हातावर टेकवले.

पीयूसी केंद्रावर मिळालेल्या प्रमाणपत्रांवर पर्यावरणास घातक ठरणाऱ्या वायूच्या वाहनामधील उत्सर्गाबाबतची माहितीच भरली जात नव्हती. काही प्रमाणपत्रांवर कर्मचारी मनात येई, ताे अाकडा लिहून माेकळे हाेत हाेते.
नियमांनी बांधले वाहतूक पोलिसांचे हात
पीयूसीप्रमाणपत्र जवळ बाळगल्याप्रकरणी पूर्वी वाहतूक पोलिस वाहनचालकांवर कारवाई करीत असत. मात्र, मोटार वाहन नियमात केलेल्या तरतुदीमुळे आता पोलिसांचे हात बांधले गेले असल्याने वाहनांवरील कारवाई पूर्णपणे थांबली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियमानुसार कोणत्याही वाहनांची प्रथम नोंदणी झाल्यापासून एका वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असेल, अशा वाहनचालकाने पीयूसी प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र मागण्याचे अधिकार पोलिस उपनिरीक्षक त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अशा अधिकाऱ्यांनी वाहनचालकाकडे या प्रमाणपत्राची मागणी लेखी स्वरूपात केली पाहिजे. हे प्रमाणपत्र त्या वेळी जवळ नसल्यास सात दिवसांमध्ये आणून दाखविले पाहिजे. जर वाहनचालकाने सात दिवसांत प्रमाणपत्र सादर केले नाही, तसेच ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा संबंधित वाहन अधिक प्रदूषण करीत असेल, तर त्या चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. मोटार वाहन नियमातील या तरतुदीमुळे सध्या पीयूसीबाबत वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

'केंद्रीय मोटार वाहन नियम' काय सांगताे...
केंद्रीयमोटार वाहन नियम, १९८९च्या नियम ११५ ११६ नुसार पेट्रोल डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी वायू प्रदूषण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषक घटकांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार परिवहन विभागाने पीयूसी केंद्रे सुरू केली. वाहनचालकांनी किमान सहा महिन्यांतून एकदा किंवा आवश्यक त्यावेळी वाहनाची तपासणी बंधनकारक आहे. पीयूसी केंद्रचालकांनी वाहनांची तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे, असा नियम आहे.

आरटीओंच्या वाहनाचा क्रमांक सांगून पीयूसी
वाहनतपासता सर्रासपणे पीयूसी कसे दिले जाते, याचा पर्दाफाश करतानाच 'डी.बी. स्टार'ने आरटीओंच्या वाहनाचादेखील पीयूसी मिळवला आ. सारडा सर्कल येथील जितेंद्र ऑटोमोबाईल्सजवळील केंद्रात दुचाकी चारचाकी वाहनांचे अधिकृतरीत्या तपासणी करता खुलेअाम पीयूसी प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती िमळाली. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी बनसाेड यांच्या सरकारी वाहनाचे (क्र. एम.एच. ०४, इ.क्यू. ०७७७) केवळ ४० रुपये माेजून पीयूसी प्रमाणपत्र िमळवले.

प्रदूषणामुळे हाेतेय डाेळ्यांच्या विकारांतही वाढ
^वाहनांच्यावाढत्या संख्येबराेबरच शहरात प्रदूषणही वाढत आ. हवेमध्ये घातक वायू िमसळले जात असल्याने डाेळ्यांच्या विकारांमध्ये वाढ झाली आ. डाेळे लाल हाेणे, डाेळ्यातून पाणी येणे, नजर कमी हाेणे यांसारख्या तक्रारी माेठ्या प्रमाणात येत आत.
डाॅ.शरद परतानी, नेत्र शल्यचिकित्सक
जीवन बनसाेड प्रादेशिकपरिवहन अधिकारी

{पर्यावरणाला घातक धंदा जाेमात
पर्यावरणास घातक ठरणाऱ्या वायूच्या वाहनामधील उत्सर्गावर िनयंत्रण ठेवण्यासाठी अनिवार्य असलेल्या पीयूसी चाचणीतून कमाईचा धंदा सुरू असून, काेणतीही तपासणी करता वाहन डाेळ्यासमाेर नसतानाही बिनधास्तपणे प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्रांची बेपर्वाई 'डी.बी. स्टार'ने उघडकीस अाणली. या केंद्रांना भेटी िदल्यानंतर 'वाहन नसले तरी चालेल, पैसे द्या प्रमाणपत्र घ्या', असे उघडपणे सांगितले गेले. विशेष म्हणजे, अारटीअाेने बाेगस पीयूसी देणाऱ्यांविराेधात माेहीम उघडली असतानाही हा प्रकार उघडपणे सुरू अाहेे. याची तीव्रता लक्षात अाणून देण्यासाठी 'डी.बी. स्टार'ने चक्क प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसाेड यांच्याच चारचाकी वाहनाचा क्रमांक िदला काेणतीही तपासणी करता निव्वळ ५० रुपयांत पीयूसी प्रमाणपत्र मिळाले. अशा या पर्यावरणाला घातक गाेरखधंद्यावर हा प्रकाशझाेत...
पुढील स्लाईडवर, सविस्तर बातमी