आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओमध्ये एजंटच ‘साहेब’, वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे उद‌्भवली स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - परिवहन आयुक्तांनी परिवहन कार्यालयांत एजंट अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद केल्याच्या आदेशाचे प्रशासनाला काही दिवसांतच विस्मरण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘दिव्य मराठी’च्या चमूने मंगळवारी (दि. २७) दिवसभर परिवहन कार्यालयात पाहणी केली. त्यात अनेक अधिकारी जागेवरच नसल्याचे आणि त्यामुळे एजंटच ‘साहेब’ बनल्याचे समोर आले. सकाळी ११ वाजेपासून दुपारी वाजेपर्यंत ‘दिव्य मराठी’च्या चमूने प्रत्यक्ष पाहिलेला अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांकडूनच एजंटांना काम करण्याची ‘संधी’ कशी दिली गेली, त्याचा हा लाइव्ह रिपोर्ट...

२३नंबर कार्यालय बंदच...
खासगीवाहनांची कागदपत्रे तपासणी स्वाक्षरीसाठी २३ नंबरच्या कार्यालयात पाठविण्यात येत होती. मात्र, सकाळी ११ ते १.३०पर्यंत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मंडोरा यांचे कार्यालय बंदच होते आणि कार्यालयाबाहेर अनेक नागरिक त्यांची वाट पाहत होते.

एजंटविना काम नाही
दरम्यान,२४ क्रमांकाच्या कार्यालयाच्या खिडकीच्या बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांना एका एजंटने सांगितले की, ‘अहो, काही करा साहेब, एजंटशिवाय तुमचे काम लवकर होणारच नाही..’ यामुळे या ठिकाणी ताटकळत बसलेले वाहनधारक अधिक त्रस्त झाले.

दुपारी २.३० वाजता
अखेरसकाळी ११ वाजेपासून कार्यालयात ‘एनओसी’साठी फिरल्यानंतर दुपारी २.३० वाजता अर्ज घेण्यात आले. मात्र, त्यातही एजंटांना प्राधान्य दिले गेल्याने नागरिकांची अधिकाऱ्यांकडूनच अशी हेळसांड होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

दुपारी १.३० वाजता
यावेळी २३ २४ क्रमांकाच्या कार्यालयांतील अधिकाऱ्यांचे आगमन झाले. २४ क्रमांकावरील अधिकारी एम. डी. वाघमारे यांनी कागदांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर ४६ क्रमांकाच्या खिडकीत कागदपत्रे जमा करण्यास सांिगतले. तेथही अधिकारी नव्हता. मात्र, खिडकीच्या बाहेर काही एजंट शोरूमचे ओळखपत्र घेऊन फिरत होते. अर्ध्या तासानंतर एक अधिकारी या खिडकीत आले. मात्र, तेही रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांऐवजी एजंटच्या ग्राहकांकडे जास्त लक्ष देत होते.

सकाळी ११.४५ वाजता
२४क्रमांकाच्या कार्यालयात गेलो असता त्या ठिकाणी अधिकारीच नव्हते. नागरिक रांगेत उभे होते. अशीच स्थिती २३ क्रमांकाच्या कार्यालयाची होती. अर्धा तास थांबल्यानंतर त्या ठिकाणी एक एजंट आला आणि त्याने सांगितले, साहेब आज उशिराने येतील. मला सांगा पाच मिनिटांत सही आणतो.’ काहींनी त्याच्याकडे कागदपत्रेही दिली.

स. ११ वाजता
आरटीओकार्यालयात आम्ही प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वारावर दोन अधिकारी होते. या दोघांपैकी एकाही कर्मचाऱ्याने आम्हाला अडविले नाही. त्यानंतर सहाचाकी गाडीच्या नॉन ऑब्जेक्शन ऑर्डर सर्टिफिकेटसाठी आलेला एक नागरिक कार्यालयातील ४५ क्रमांकाच्या खिडकीवर गेला त्याने अर्ज घेतला. त्यास नऊ क्रमांकाच्या खिडकीवर जाण्याचा सल्ला देण्यात आला. या खिडकीवर महिला अधिकारी बसलेली होती. त्या अर्जावर स्वाक्षरी केल्यानंतर आता तुम्ही २४ क्रमांकावर जा, असे सांगितले.

दुपारी १.३० वाजता या कार्यालयात अधिकाऱ्यांचे आगमन झाले.
आरटीओ कार्यालयातील २३ क्रमांकाचे कार्यालय मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद होते.

नागरिकांनी थेट संपर्क साधावा
-सकाळच्यावेळेस दररोज अधिकाऱ्यांची बैठक सुरु असते त्यामुळे अधिकारी जागेवर नसतील. कार्यालयाच्या आवारात एकही एजंट फिरत नाही. नागरिकांना कोणताही त्रास होत असेल तर त्यांनी थेट संपर्क साधावा. जीवनबनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

कार्यालय अधिकारीविना
-सकाळी११ वाजेपासून अर्जावर स्वाक्षरी घेण्यासाठी आरटीओ कार्यालयातील २४ नंबरच्या खिडकीबाहेर रांगेत उभे आहोत. पण, दोन तास उलटूनही अधिकारी आलेले नाही. एजंट मात्र वारंवार येत आहेत. राफीकसय्यद, नागरिक