आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुलभ’च्या परीक्षेत आरटीओ झाले ‘फेल’, एजंट्सचा मुक्त वावर; अधिकारी, कर्मचा-यांचा असहकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मध्यस्थाविना काम करण्यासाठी योजण्यात आलेल्या ‘सुलभ’ कार्यप्रणाली योजनेच्या पहिल्याच दिवशीच्या परीक्षेत मंगळवारी (दि.10) ‘आरटीओ’ विभाग ‘फेल’ झाल्याचे दिसून आले.
अधिकारी कर्मचा-यांकडून कार्यालयात येणाऱ्यांना ना मार्गदर्शन, ना त्यांच्याशी सुसंवाद साधला गेला. नागरिकांना किरकोळ कामांसाठी पाच दिवसांचा अवधी लागत असल्याने अनेक अर्जदारांनी प्रादेशिक परिवहन विभागावर नाराजी व्यक्त केली. एजंट्सला प्रवेश बंद असूनही मंगळवारी सर्वच एजंट्स कार्यालयात मुक्तपणे वावरत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या निदर्शनास आले.
‘अारटीअाे’त एजंट आणि मध्यस्थ व्यक्तींना १७ जानेवारीपासून प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. या आदेशाचा विभागास विसर पडल्याचे एजंट्सच्या मुक्त वावरातून निदर्शनास आले होते. वाहन पासिंग करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून अडवणूक करण्यात येऊन एका कामासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला. पूर्वी हे कामे एजंटमार्फत वाहनाशिवाय होत असल्याचेही ट्रकमालकांनी सांगितले. आयुक्तांच्या आदेशाने अधिकारी कर्मचाऱ्यांची ‘रसद’ बंद झाल्यानेच अडवणूक केली जात असल्याची चर्चा आहे. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी दुपारी १२ ते या वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर विभागाच्या असंख्य उणिवा चव्हाट्यावर आल्या. प्रवेश बंद असूनही एजंट्सच्या माध्यमातून ओळखीच्या नागरिकांना मार्गदर्शन सुरूच असल्याचे या पाहणीत निदर्शनास आले.

दुपारी : पासिंगस्थ‌ळावर वाहनांच्या रांगा लागल्याचे निदर्शनास आले. अत्यावश्यक सेवा असलेली रुग्णसेविकादेखील दोन दिवसांपासून पासिंगकरिता आणण्यात येत होती. डॉक्टरांना देखील अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून आले.

मार्गदर्शन कक्ष नावाला
याकार्यालयातील मार्गदर्शन कक्ष नावापुरताच अाहे. येथे शिपाई अर्ज देतो. अर्ज भरण्यासंबंधी विचारले, तर अधिकारी नसल्याचे सांगितले जाते. अश्विनीगायकवाड, अर्जदार

खासगीकरणाचा डाव-
एजंट्सलाहटवून विभागाचे खासगीकरण करण्याचा डाव आहे. एजंट्सनी काम बंद केले आहे. कोणी आल्यास त्यांना केवळ मार्गदर्शन केले जाते. मनोजजाधव, अध्यक्ष, एजंट सघंटना

दोन दिवसांत सुरळीत-
नवीनकार्यप्रणाली दोन दिवसांत सुरळीत होणार आहे. अधिकाऱ्यांना प्रणालीबाबत सूचना देण्यात येत असून, त्यांना मार्गदर्शन सुरू आहे. अविनाशराऊत, उपप्रादेशिक अधिकारी

‘ऑनलाइन शिवाय पर्याय नाही...’
परवान्याप्रमाणेआरटीओ विभागाचा सर्वच कारभार ऑनलाइन केल्याशिवाय पर्याय नाही. तसे केल्यावरच एजंट्स कायमचे हद्दपार होतील. दरम्यान, एजंट्स बंद झाल्याने काही अधिकाऱ्यांची परवड झाली असून, आठ-दहा दिवसांचे चहाचे बिल रखडले असल्याचे चहा विक्रेत्याने सांगितले.

..या योजना कागदावरच
विनामध्यस्थसुलभ कार्यप्रणाली योजना कागदावरच असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवर आदेश दिले जातात. मात्र, योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी उपाय केले जात नसल्याची खंतही कर्मचा-याने व्यक्त केली.

दुपारी १२ वाजता : प्रवेशद्वारावरमहिला अधिकाऱ्याकडून कार्यालयात येणाऱ्या वाहनचालकांची चौकशी केली जात होती. पायी येणाऱ्यांची विचारणा हाेत नसल्याने एजंट्स असो की, सामान्य नागरिक सर्वच बिनधास्तपणे कार्यालयात प्रवेश करत होते.

दुपारी १२.३० : विविधखिडक्यांवर गर्दी होती. येथे एजंट्सचा मुक्त वावर होता. कर्मचारी अथवा अधिकारी येथे दिसला नाही. मार्गदर्शन केंद्रात अधिकारी नसल्याने शिपाई अर्ज देत होते. अर्ज कसा भरायचा याबाबत विचारले असता एजंटकडे जा, असे सांगितले गेले.