आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओत 18 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी चौघांवर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) संगणकात फेरफार करून खासगी वाहनाची टॅक्सी संवर्गात नोंदणी करत त्यापोटी भरलेला सुमारे 18 लाख रुपयांचा एकरकमी कर बनावट कागदपत्रांच्या आधारे लांबवल्याप्रकरणी या कार्यालयातील कर्मचार्‍यांसह चौघांवर पंचवटी पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडामकर यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक नितीन पाटील, राजयोग ट्रॅव्हलचे संचालक योगेश लोखंडे, कार्यलयीन वरिष्ठ लिपिक किरण चंद्रात्रे यांच्यासह एका संशयितावर शासकीय कागदपत्रांत फेरफार करून अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

फेब्रुवारी ते जुलै महिन्यात हा प्रकार अधिकार्‍यांच्या लक्षात आला. जेम्स यांच्या मालकीची जग्वार वाहन (एमएच 15 डीसी 0001) व मिलिंद कचेश्वर जाधव यांची र्मसिडीज (एमएच 15 डीएक्स 5610) या दोन वाहनांची नोंद खासगी वाहन म्हणून झालेली असताना पुन्हा टॅक्सी संवर्गात करण्यात आली. याद्वारे सुमारे 18 लाख रुपयांचा आपहार करण्यात येऊन शासनाची फसवणूक करण्यात आली. पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे अधिक तपास करीत आहेत.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांना शहरात जग्वार गाडी फिरताना आढळली. मालक तसेच वाहन नोंदणीबाबत त्यांनी माहिती घेतली असता हा प्रकार उघड झाला.