आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 लाखांच्या अपहारप्रकरणी संशयित मोकाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आरटीओ कार्यालयात सुमारे 18 लाखांचा अपहार करणार्‍या संशयितांना अटक करण्यासाठी माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, अद्याप कोणास अटक केलेली नाही. कर्मचार्‍यांना हाताशी धरून संगणकात फेरफार करून खासगी वाहनाची टॅक्सी संवर्गात नोंदणी करत त्यापोटी भरलेल्या सुमारे 18 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी चौघांवर पंचवटी पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे नितीन पाटील, राजयोग ट्रॅव्हलचे योगेश लोखंडे, वरिष्ठ लिपिक किरण चंद्रात्रे यांच्यासह एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलिसांनी याबाबत आरटीओ कार्यालयातील सर्व दस्तऐवज आणि संबंधित वाहनांच्या कागदपत्रांसह बँकांचीदेखील माहिती मागवली आहे. यामध्ये आणखी अपहार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सर्व बाबी तपासून संशयितांना अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी सांगितले.