आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहारप्रकरणी सबळ पुरावे : भोसले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आरटीओ कार्यालयात 18 लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी पोलिसांना सबळ पुरावे मिळावे असून, संशयितांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी दिली. तिघा फरार संशयितांच्या शोधासाठी विशेष पथक पाठवले आहे.

संगणकात फेरफार करून खासगी वाहनाची टॅक्सी संवर्गात नोंदणी करत सुमारे 18 लाखांच्या अपहारप्रकरणी यश मोटार ड्रायव्हिंगचे नितीन पाटील, राजयोग ट्रॅव्हलचे योगेश लोखंडे, वरिष्ठ लिपिक किरण चंद्रात्रे यांच्यासह एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.