आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओची दिवाळी पाच कोटींची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीमध्ये दुचाकीसह चारचाकी आणि मालवाहतूक करणारे इतर वाहनांची लक्षणीय विक्री झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाची दिवाळी जोरात झाली. अवघ्या पाच दिवसांत कोटी ४० लाख २१ हजारांचा महसुल आरटीओला प्राप्त झाला. इतर कारवाई मध्येही कोटींचा दंडवसूल करण्यात आला.

दिवाळी सण अनेकांचे दिवाळे काढते अशी म्हण आहे. मात्र दिवाळीच्या पाच दिवसांत जिल्ह्यात तब्बत हजार दोनशे १७ वाहनांची विक्री झाली. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश अाहे. यासर्व वाहनांच्या नोंदणीच्या माध्यमातून आरटीओला तब्बल कोटी ४० लाख २१ हजार ७०७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यासह अारटीओ विभागात विविध कर अाणि कारवाईद्वारे सुमारे दोन कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे. दिवाळीच्या सणामध्ये शासनास सर्वाधिक महसुल प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त झाला आहे. सोमवार (दि.९) हा शासकीय कामकाजाचा दिवस वगळता. रविवार (दि.१५) पर्यंन्त सलग सहा दिवस शासकयी सुट्टी होत्या. नोव्हेंबर ते सोमवार (दि.९) या कालावधीत नवीन वाहनांची सर्वाधिक नोंदणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपप्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांच्यासह आरटीओ अधिकाऱ्यांना अतिरिक्त काम करत शासनास विक्रमी महसूल प्राप्त करुन दिला.

नाेंदणीद्वारे महसूल
दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकीसह चारचाकी इतर वाहनांची विक्रीने पाच दिवसांत कोटी ४० लाख २१ हजारांचा महसूल आरटीओला प्राप्त झाला. हजार दोनशे १७ वाहनांची विक्री झाली. या वाहनांच्या नोंदणीच्या माध्यमातून आरटीओला सुमारे साडेपाच काेटीचा महसूल मिळाला.