आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारटीअाे-पाेस्टाच्या असमन्वयामुळे लायसन्स, अारसी बुकसाठी वणवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बनावटकागदपत्रांच्या आधारे लायसन्स काढणाऱ्यांवर आळा बसावा तसेच कमी कालावधीत नागरिकांना परवाना मिळावा, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. वाहन चालवण्याचा परवाना हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. घराचा पत्ता, जन्मतारखेचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा या तीन कागदपत्रांच्या आधारावर आतापर्यंत वाहन चालवण्याचे लायसन्स मिळत असे. ओळखीचा पुरावा तसेच घराचा पत्ता दर्शवण्यासाठी लायसन्स महत्त्वाचे ठरते. पासपोर्टसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठीदेखील लायसन्सचा वापर होतो. आतापर्यंत कोणताही पत्ता देऊन लायसन्स काढले जात असे. अनेकांनी तर बाहेरगावचा किंवा परराज्यातला पत्ताही लायसन्ससाठी दिला होता. अनेक परदेशी नागरिकांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे लायसन्स मिळवल्याचे आरटीओ कार्यालयातील अधिकारी सांगतात. ही बाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याने केंद्र शासनाने लायसन्स घरपोच देण्याची योजना आखली. पत्ता बरोबर असला तरच वाहनचालकांना परवाना मिळू शकतो. यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे लायसन्स काढणाऱ्यांवर आळा बसेल, अशी अपेक्षा प्रशासनाला हाेती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरत असल्याची चिन्हे िदसत असून, नागरिकांना तब्बल चार-पाच महिने उलटूनही परवाने मिळत नसल्याच्या, तसेच चुकीच्या पत्त्यांवर परवाने जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या अाहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एक आरसी बुक लायसन्स घरपोच पाठविण्याचे ५० रुपये इतके अतिरिक्त शुल्क घेतले जाते. िवशेष म्हणजे, हे शुल्क देऊनही वेळेत कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्रारी अाहेत. पोस्टात पाठविण्यात आलेल्या अनेक आरसी बुक लायसन्सचा पत्ता मिळत नसल्याचे कारण देत ते परिवहन कार्यालयात परत पाठविले जात अाहेत. मात्र, या प्रकारामुळे पोस्टाचा खर्च म्हणून घेतल्या जाणाऱ्या या पैशांचे नेमके काय होते, याची माहिती अधिकारीही देऊ शकत नसल्याने अाश्चर्य वाटते.

दुय्यमप्रत काढण्याचा देतात सल्ला
परवानेघरपोच पाठविण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा विलंब होत असल्याच्या तक्रारी असतानाच, अनेकांना वर्ष उलटूनही आरसी बुक लायसन्स मिळाले नसल्याचे समजते. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून आरसी बुक लायसन्सची दुय्यम प्रत काढण्याचा सल्ला देण्यात येताे. मुळात, अनेकांची कागदपत्रे काेणत्या पत्त्यावर गेली, ती पाेहाेचली किंवा नाहीत, याबाबत शहानिशा करण्याएेवजी अधिकारी केवळ सल्ला देण्यात धन्यता मानत असल्याने तक्रारदारांनी संताप व्यक्त केला आहे.
अारटीअाे विभागाने वरिष्ठ पाेस्टमास्तर यांना लेखी सूचनेद्वारे मिळालेल्या कागदपत्रांबाबत अशाप्रकारे जाब विचारला हाेता.

^गेल्या वर्षभरापूर्वीमी दुचाकी वाहन खरेदी केले. त्याचे आरसी बुक पोस्टाद्वारे घरपोच येणार असल्याचे अारटीअाे विभागाकडून सांगण्यात अाले होते. मात्र, वर्ष उलटूनदेखील अद्याप मला अारसी बुक मिळालेले नाही. याबाबत विचारणा केल्यास याेग्य मार्गदर्शनही मिळत नाही. - निशांत तपासे, तक्रारदार

वाहनचालकांची हाेते गैरसाेय...
^अनेकठिकाणी पाेलिसांकडून वाहनांची तपासणी केली जाते. एकही कागदपत्र नसले तर दंडात्मक कारवाईही हाेते. वाहनधारकांचे लायसन्स अथवा अारसी बुक पाेस्टात अडकलेले असले तरी पाेलिसांकडून मात्र दंड भरण्याचीच मागणी हाेते. - जावेद मनियार, वाहनचालक

पोस्ट अाॅफिसातही मिळेना आरसी बुक..
^चारचाकी वाहनखरेदी केल्यानंतर त्याचे आरसी बुक पोस्टाने घरपोच येईल, असे आरटीआेकडून सांगण्यात आले. वर्ष उलटूनही आरसी बुक घरपोच आले नसल्याने पोस्टात चौकशी केली. मात्र, त्याचा शोध लागला नाही. अधिकाऱ्यांकडून मात्र दुय्यम प्रत काढण्याचा सल्ला मिळाला. - नितीन काकड, तक्रारदार

अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज..
^वाहन घेतल्यावर वर्ष उलटूनही आरसी बुक अालेले नाही. वाहतूक पोलिसांकडून आरसी बुक दाखविण्याची मागणी केली जाते, नसेल तर दंड भरावा लागतो. पोस्ट आणि आरटीआेच्या गोंधळात अाम्हा वाहनधारकांचे नुकसान होते. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. - फरीद शेख, नागरिक

तब्बल पाच महिन्यांचा विलंब
गेल्याकाही दिवसांपासून परिवहन कार्यालयातून निघालेले परवाने जनतेच्या दारात पोहोचण्यापूर्वी पोस्टात अडकल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. परिणामी, परवाने पोहाेचण्यासाठी तब्बल पाच महिन्यांचा विलंब होत असल्याने नागरिकांना गैरसाेयीचा सामना करावा लागत अाहे.

परिपूर्ण माहिती अर्जात भरणे गरजेचे..
आउटसोर्सिंग कंपनीचे कर्मचारी, आरटीओ कार्यालय आणि पोस्ट खात्यात योग्य समन्वय नसल्याने या योजनेचा फज्जा उडाला असल्याचे स्पष्ट हाेते. तरी काही अर्जदारांनीही लायसन्ससाठी अर्ज करताना चुकीची वा अर्धवट माहिती दिल्याने त्यांची आणि विभागाची गैरसोय होत असल्याचेेही दिसून येते. त्यामुळे मुळात अर्जदारांनीच लायसन्ससाठीचा अर्ज भरताना आपली माहिती पत्ता परिपूर्ण देणे गरजेचे आहे.

तयार असूनही मिळेना
अनिकेत निलावार यांचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले. नवीन लायसन्स मिळण्यासाठी त्यांनी ३० सप्टेंबर रोजी आरटीओमध्ये अर्ज केला. ओळखीमुळे त्यांचे काम झटपट झाले. तत्काळ कार्डाची पावती मिळाली आणि स्मार्ट कार्डही तयार झाले; पण आपले हे कार्ड हातात देता घरपोच पाठवले जाईल, असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. एक महिना उलटला; पण अद्याप त्यांना लायसन्स मिळाले नाही. त्यांनी स्वत: दोन-तीन वेळा आरटीओत फेऱ्या मारल्या. ते दोन वेळा जुना बाजार येथील टपाल कार्यालयातही जाऊन आले, पण उपयोग झाला नाही. तेथील कर्मचारी योग्य पद्धतीने बोलत नसल्याचाही अनुभव अाल्याने त्यांना मनस्तापाला सामाेरे जावे लागत अाहे.

योजना ठरतेय अर्जदारांसाठी डोकेदुखी
आधी लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर आरटीओ कार्यालयातर्फे ही यादी आउटसोर्सिंग कंपनीकडे जाते. कंपनीमार्फत स्मार्ट कार्डावर नाव, गाव सर्व माहिती भरण्याचे काम कंपनीचे कर्मचारी करतात. त्यानंतर हे स्मार्ट कार्ड टपाल खात्याकडे दिले जाते. लिफाफे बनवणे, पत्ता टाकणे आणि हे पाकीट पत्त्यावर पाठवण्याचे काम टपाल खात्याचे आहे. पण, तिन्ही विभागांच्या चुकांमुळे चांगला उद्देश समोर ठेवून सुरू करण्यात आलेली ही योजना अर्जदारांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. तीन स्तरांवर होणाऱ्या या कामात योग्य समन्वय नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे बाेलले जाते.

प्रकरण :
सातपूर परिसरातील एका नागरिकाने दुचाकी वाहनाचे आरसी बुक पोस्टाद्वारे येत नसल्यामुळे एजंटकडून आरसी बुक काढण्याचे ठरविले अन् एका महिन्याच्या आत दुचाकीचे आरसी बुक एजंटमार्फत देण्यात आले. याबाबत त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना माहिती दिली असता त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अाजही परिस्थिती जैैसे थे असून, प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाकडे काणाडाेळाच केला जात असल्याचा अनुभव त्यांना अाला.
प्रकरण :
पंचवटी परिसरातील एका नागरिकाने गेल्या वर्षभरापूर्वी डस्टर हे चारचाकी वाहन खरेदी केले. त्यांनी वाहनाचे सर्व कागदपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिले होते. तसेच, घरपोच आरसी बुकसाठी अतिरिक्त शुल्कही त्यांनी अदा केले होते. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना आरसी बुक मिळाले नाही. या संदर्भात त्यांनी पोस्टात माहिती घेतली असता त्यांच्या नावाचे आरसी बुक पोस्टात आलेच नसल्याचे सांगण्यात अाले. तसेच, आरटीआे कार्यालयात चौकशी केली असता पोस्टात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी परत पैसे भरून दुय्यम प्रत काढण्याचा सल्ला दिला.
प्रकरण :
गंजमाळ परिसरातील एका युवकाने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दुचाकी वाहन खरेदी केले. या वाहनाची सर्व कागदपत्रे शोरूममार्फत प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठविण्यात आल्यानंतर सहा महिन्यांनंतर त्याची चौकशी केली असता पोस्टात आरसी बुक येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वर्ष उलटूनदेखील अद्याप आरसी बुक मिळाले नसल्याने त्यांना अनेक अडचणी उद्‌्भवत अाहेत.
नसती डोकेदुखी झाली
लायसन्स आरसी बुक महत्त्वाची कागदपत्रे आहेत. पण, ती मिळालीच नसल्याने वाहन चालवताना पोलिसांनी अडवल्यास दंड भरावा लागताे. पत्ता चुकल्याने कार्ड परत गेले तर पुन्हा ५० रुपये भरून कार्ड मागवावे लागते. याबाबत आरटीओ किंवा पोस्ट खात्यात कोणीच व्यवस्थित सांगत नसल्याने जुनीच पद्धत बरी होती, असे अनेक तक्रारदारांनी ‘डी. बी. स्टार’कडे बाेलून दाखवले.
अशी आहेत प्रकरणे
नागरिकांना वाहन परवान्यासाठी परिवहन कार्यालयाच्या खेटा माराव्या लागू नयेत म्हणून कार्यान्वित करण्यात अालेल्या "स्मार्ट’ योजनेबद्दल माेठ्या अपेक्षा असताना, प्रत्यक्षात मात्र तीदेखील फाेल ठरली अाहे. आरटीआे कार्यालयातून वितरित केलेले परवाने तब्बल चार-पाच महिने उलटूनदेखील पोहोचत नसल्याच्या तक्रारींचा अाेघ वाढू लागला अाहे. याबाबत ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत अर्जदारांच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेले ३० टक्के लायसन्स तसेच आरसी बुक आरटीओ कार्यालयाकडे परत पाठविण्यात आले असल्याचे तसेच एकाचे कागदपत्रे दुसऱ्याच्या पत्त्यावर पाठविण्यात अाल्याचे धक्कादायक प्रकार निदर्शनास अाले. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे माेठ्या प्रमाणावर गैरप्रकारही घडण्याची शक्यता असताना अधिकारी मात्र केवळ दुय्यम प्रत घेण्याचा सल्ला देत असल्याचेही दिसून अाले. यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
{चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही मिळेना परवाने, कागदपत्रे
{तक्रारी केल्यास केवळ दुय्यम प्रत काढून घेण्याचा अधिकारी देतात सल्ला
{ प्रादेशिकपरिवहन विभागाकडून सुरू करण्यात आलेली घरपोच आरसी बुक परवाना ही योजना नेमकी काय आहे?
-नागरिकांना वाहन परवान्यासाठी परिवहन कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज पडू नये, म्हणून या योजनेअंतर्गत घरपोच आरसी बुक परवाने पोस्टाद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली आहे.
{ गेल्याकाही महिन्यांपासून अनेक नागरिकांना पोस्टाद्वारे घरपोच आरसी बुक परवाने प्राप्त हाेत नसल्याच्या तक्रारी अाहेत, काय कारण?
-अर्जदारांनी लायसन्ससाठी अर्ज करताना चुकीची वा अर्धवट माहिती दिल्याने तो परवाना परत येताे आणि अर्जदारांच्या घरी पोहाेचत नाही. याबाबत काळजी घेणे गरजेचे अाहे.
{ अनेकजणांचे पोस्टातही आरसी बुक परवाने आलेले नाही आणि आरटीआे कार्यालयातही नाही अशा अर्जदारांचे काय?
-ज्या अर्जदारांचे आरसी बुक परवाने पोस्टाद्वारे घरी आलेले नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शनिवारी आरसी बुक परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांची गैरसाेय टळेल.