आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओला घातला पंधरा लाखांना गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लाखो रुपये किमतीच्या अलिशान कार व मोटारींची खरेदी करणार्‍या वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन विभागाला 15 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यामध्ये आरटीओतील काही कर्मचारी व एजंटांना हाताशी धरून कार्यालयात प्रत्यक्षात कर न भरता परस्पर संगणकावर कर भरल्याच्या नोंदी दाखवित हा गंडा घातला. परिवहन विभागाच्या प्राथमिक चौकशीत अशी 16 वाहने असल्याचे निष्पन्न झाले असून, यात एका ट्रॅव्हल एजंटचा सहभाग स्पष्ट दिसत आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

परिवहन विभागात वाहन खरेदीनंतर एकरकमी कर भरून वाहनांची नोंदणी केली जाते. या नोंदणीनंतरच वाहनधारकांना आकर्षक अथवा नियमित क्रमांक विभागाकडून दिला जातो. मात्र, काही महिन्यांपूर्वी एक र्मसिडीज कारचा एकरकमी कर कार्यालयात भरलेला नसतानाही त्यांच्याकडे हा कर भरल्याची पावती आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. या पाठोपाठ विभागातील अधिकार्‍यांनी अंतर्गत चौकशी केली असता टूरिस्ट टॅक्सी व इतर वाहनांचा यापूर्वी दरवर्षी भरून घेण्यात येणारा कर गेल्या वर्षापासून एकरकमी भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेचे संगणकीकरण झाले असतानाही हा कर भरताना तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत पावत्या फाडून कर भरून घेतल्याचे प्रकार पुढे आले आहे.