आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ कार्यालयात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तपासणीसाठी अाणलेल्या वाहनात दाेष काढल्याने संतप्त झालेल्या वाहनचालकांनी आरटीओ कार्यालयातील आय अॅण्ड सी सेंटरची तोडफोड केली. शनिवारी (दि. ७) दुपारी वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारलेल्या देशातील पहिल्या आय अॅण्ड सी सेंटरमधील अत्याधुनिक मशिनद्वारे कमर्शियल वाहनांच्या मशिनमध्ये अन्य काही दोष असल्यास तत्काळ निदान होते. दिवसभरात १०० वाहनांची सेंटरमध्ये तपासणी केली जाते. नेहमीप्रमाणे वाहन तपासणी सुरू असताना एका कंपनीचे पाच ते सहा आणि अन्य सात ते आठ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वाहन सदोष असल्याचे निदान झाले. संगणकावर फेल असे प्रमाणपत्र आल्यानंतर सेंटरच्या कर्मचाऱ्याने वाहने दुसऱ्या दिवशी घेऊन येण्यास सांगितले. सेंटरमध्ये सकाळपासून अाल्याने अाणि शेवटी वाहनांमध्ये दोष काढल्याने वाहनचालक संतप्त झाले. त्यांनी सेंटरच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली चार मशीनची तोडफोड करण्यात आली. एका मशीनची किंमत सुमारे २५ लाख रुपयांच्या पुढे आहे. केंद्र सरकारने रोजमाटा कंपनीला प्रायोगिक तत्त्वावर हे सेंटर चालवण्यास दिले आहे. आरटीओ अधिकाऱ्यांना फक्त प्रमाणपत्रावर सह्यांचा अधिकार असल्याने याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांनी काेणतीही प्रतिक्रिया दिली नाही. घटनेची माहिती समजताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत तोडफोड करणारे संशयित फरार झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

लाखोंचे नुकसान..
^शनिवारी दुपारी अचानक ३० ते ३५ जणांनी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची तोडफोड केली. स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राला १५ कोटी खर्च आलेला आहे. तोडफोडीमुळे लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्व साहित्याचा विमा काढलेला आहे. त्यामुळे विमा कंपनीच आता या खर्चाचा अंदाज सांगेल. - नितीन गुलाटी, व्यवस्थापक,स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र

तक्रार आल्यास कारवाई
^अारटीअाेमधील सेंटरचीतोडफोड झाल्याची तक्रार आल्यास संशयितांच्या विरोधात दंगलीचा सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तपास करून संशयितांवर कारवाई केली जाईल. - प्रकाश सपकाळे, वरिष्ठनिरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे

परदेशातून मशिन आयात
खासगी वाहनांच्या मशिन आणि अन्य तपासणीसाठी केंद्र शासनाने आय अॅण्ड सी सेंटर नाशिकला सुरू केले अाहे. येथे लागणाऱ्या सर्व मशिन स्पेनमधून आयात करण्यात आल्या आहेत. परदेशी अभियंत्यांनी याकेंद्रात प्रशिक्षण दिले होते. मात्र, हे सेंटर ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे बनले अाहे.

कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी
सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी काही वाहनधारकांनी केल्या. केंद्र सरकारने रोजमाटा कंपनीस हे सेंटर चालविण्यास िदले असून, यापूर्वी ही कंपनी केंद्राने काळ्या यादीत टाकली हाेती, तरीही याच कंपनीला पुन्हा कंत्राट दिल्याने या सेंटरमध्ये घोटाळा असावा, अशा संशय सूत्रांनी व्यक्त केला.

अाय अॅण्ड सी सेंटरमधील तपासणी यंत्रांची संतप्त वाहनचालकांनी केलेली ताेडफाेड.
---------------------------------
बातम्या आणखी आहेत...