आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन दिवाळीत शिमगा..सोशल मीडियावरच \'सैन्य भरती\'; देवळाली कॅम्पमध्ये युवकांची मोठी गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सोशल मीडियावर आलेल्या सैन्य भरतीच्या अफवेवर विश्वास ठेवत नाशिकमधील देवळाली कॅम्पला राज्यभरातून पोहचलेल्या हजारो तरुणांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. भरती तर झालीच नाही पण ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ रविवारी रात्री युवकांवर आली.

सैन्य भरती प्रक्रिया राबवल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्पमध्ये सोमवारी पहाटेपासून 116 इन्फंटरी बटालियन प्रादेशिक भरती होणार असल्याचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर विश्वास ठेवून राज्यभरातले हजारो युवक रविवारी रात्रीच देवळाली कॅम्पमध्ये पोहोचले.

व्हॉट्सअॅपवरुन व्हायरल झाला सैन्य भरतीचा मेसेज...
देवळाली कॅम्पमध्ये सोमवारी (16 ऑक्टोबर) पहाटेपासून 116 इन्फंटरी बटालियन प्रादेशिक भरती होणार असल्याचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर विश्वास ठेवून राज्यभरातले हजारो युवक काल (रविवार ) रात्रीच देवळाली कॅम्पमध्ये पोहोचले होते. परंतु, सैन्य भरतीबद्दल कुठलीच अधिकृत माहिती न मिळू लागल्याने गोंधळ उडाला. सैन्य प्रशासनाला विचारणा होऊ लागल्याने “अशी कुठलीही भरती नसल्याचा फलकच” प्रशासनाने कार्यालय बाहेर लावण्यात आला. .यामुळे मोठा मनस्ताप झालेले तरुण घरूण आणलेल्या भाकरी खात आणि अफवा पसरवणाऱ्यांचा निषेध करत सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांनी परतीचा रस्ता धरला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला सैन्य भरतीच्या अफवेचा मेसेज पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...