आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता मुक्त विद्यापीठाचा पेपर फुटल्याची चर्चा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ओपीएन-101 या संकेत क्रमांकाचे कला आणि वाणिज्य शाखेचे पेपर 26 मे रोजी फुटल्याच्या चर्चेला मंगळवारी शैक्षणिक वर्तुळात उधाण आले. याबाबत रात्री उशिरा विद्यापीठाशी संपर्क साधला असता परीक्षेची तारीख पुढे ढकलली असताना नागपूर परिसरातील दोन केंद्रांवर चुकीने प्रश्नपत्रिकांचे पाकीट फोडण्यात आले असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी सांगितले.
या प्रकरणाला पेपरफुटी म्हणता येणार नसले तरीही विद्यापीठाच्या जबाबदारीनुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आल्याचे डॉ. अतकरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. 26 मे 2012 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विक्रीकर निरीक्षक तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परीक्षा होत्या. याचदिवशी मुक्त विद्यापीठाचे कला आणि वाणिज्य शाखांचे ओपीएन-101 या संकेत क्रमांकाचे पेपर येत असल्याने ही परीक्षा 2 जून रोजी होणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी जाहीर केले होते. यानंतर 2 जून रोजीचाही पेपर पुन्हा पुढे ढकलल्याची सूचना विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी वारंवार परीक्षा पुढे ढकलली जात असल्याबद्दल शंकाही उपस्थित केली होती. दरम्यान, 26 मे रोजी होणारा पेपर आता 9 जूनला सकाळी 10 ते 1.30 या वेळेत होणार असल्याची माहिती डॉ. अतकरे यांनी दिली.