आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मखमलाबाद परिसरात बिबट्याच्या दर्शनाची अफवा, भीतीचे वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - म्हसरूळ व मखमलाबाद परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याच भागातील गंगावाडी परिसरात शनिवारी (दि. २) पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन घडल्याची अफवा पसरली. मात्र, या परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे स्पष्ट करत बिबट्याचा संचाराबाबत अफवा पसरविल्या जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

शहरातील मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीचा भाग असलेल्या दिंडाेरीरोड, मखमलाबाद, म्हसरूळ परिसरात मुक्त वावर असलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या या परिसरात बिबट्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाली होती. शनिवारी गंगावाडी परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याची अफवा पसरली. यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...