आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेतही लष्कराची शिस्त, 'Run for Fun 'नंतर विद्यार्थी लष्करी अधिकाऱ्यांनी परिसर केला प्लास्टिकमुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लष्कर म्हटले की शिस्त. ही शिस्त केवळ युद्ध, गणवेश, व्यायामापुरतीच मर्यादित नसून, स्वच्छतेसाठीही ती असल्याचे चित्र 'रन फॉर फन' या कार्यक्रमात रविवारी पाहावयास मिळाली. स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वर्धापनदिनानिमित्त अायाेजित 'रन फॉर फन' या कार्यक्रमानंतर पाणी पिल्यानंतर खाली टाकलेले प्लास्टिकचे ग्लास वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह त्यांच्या मुलांनी स्वयंस्फूर्तीने उचलून डस्टबिनमध्ये टाकून परिसर स्वच्छ करत स्वच्छतेच्या शिस्तीचा अादर्श शहरवासीयांपुढे ठेवला.

लष्कराच्या शिस्तीचे सामान्य नागरिकांना विशेष आकर्षण असते. नाशिक शहरात स्कूल ऑफ आर्टिलरी, आर्टिलरी सेंटर, एअरफोर्स या लष्कराच्या महत्त्वाच्या केंद्रांमध्ये जवानांचा कायम राबता असताे. यामध्येही त्यांची शिस्त विशेष लक्षात ठेवण्यासारखी असते. रविवारी (दि. १२) स्कूल ऑफ आर्टिलरीने खंडोबा टेकडीजवळ 'रन फॉर फन' या कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते. हा कार्यक्रम संपल्यानंतर तेथील मैदानावर उपस्थितांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली होती. यावेळी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचे पॅकबंद ग्लास ठेवण्यात अाले हाेते. पाणी प्राशन केल्यानंतर अनेकांनी हे ग्लास बाजूला जमिनीवर टाकले होते. त्यामुळे मैदानाच्या एका बाजूला प्लास्टिकचे ग्लास पसरलेले होते. परंतु, याबाबत कोणीही एकाने चकार शब्द काढला नाही; परंतु कार्यक्रम संपल्यानंतर सर्व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह त्यांच्या मुलांनी स्वयंस्फूर्तीने हे ग्लास उचलू्न डस्टबिनमध्ये टाकले आणि परिसरात स्वच्छता करीत स्वच्छ परिसरासाठीही शिस्त महत्त्वाची असल्याचे यावेळी दिसून आले.
देवळाली कॅम्प येथील खंडाेबा टेकडी शेजारील युनिट मैदानावर रविवारी 'रन फॉर फन'मध्ये सहभागी महिला युवती.


स्कूल अाॅफ अार्टिलरीच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त 'रन फॉर फन' या धावण्याच्या स्पर्धेनंतर परिसर स्वच्छ करताना लष्करी अधिकारी विद्यार्थी. इन्सेटमध्ये प्लास्टिकचे ग्लास डस्टबिनमध्ये टाकताना अधिकारी.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर छायाचित्रे