आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँड्रॉईड मोबाइल्सवरही मोदींची धाव, ‘रन मोदी रन’ गेमला मोबाइल युर्जसची पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक- टेक्नोसॅव्ही व नेटसॅव्ही असणार्‍या नरेंद्र मोदींचे भाजपतर्र्फे चांगलेच ब्रॅँडिंग होत असताना, आता अँड्रॉईडवरील गेम्सच्या माध्यमातूनही नरेंद्र मोदी चिमुकल्यांपासून तरुणाईपर्यंत पोहोचत आहेत. मोदींना मध्यवर्ती ठेवून ‘रन मोदी रन’ या अँड्रॉइड मोबाइल्ससाठी तयार करण्यात आलेल्या गेमला दिवसेंदिवस पसंती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच सोशल मीडियासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नरेंद्र मोदींचे ब्रॅँडिंगही मोठय़ा प्रमाणावर केले जात आहे. मोदींना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यात येत असतानाच आता मोबाइलवर ‘रन मोदी रन’ या गेमचाही चांगलाच बोलबाला आहे.