आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या निवासस्थानी रंगलेल्या शानदार सोहळ्यात प्रख्यात धावपटू अंजना ठमकेला नॅनो कार प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय अँथलेटिक्स स्पर्धेमध्ये 16 वर्षांखालील सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून ही कार बक्षीस मिळाली होती. महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते बुधवारी कारच्या चाव्या तिला देण्यात आल्या.
जिल्हा अमॅच्युअर अँथलेटिक्स असोसिएशनद्वारे आयोजित सोहळ्यात गेल्या वर्षभरात विशेष कामगिरी केलेल्या 20 खेळाडूंचा सत्कार महसूल आयुक्त जाधव, जिल्हाधिकारी पाटील, महापालिका आयुक्त संजय खंदारे, विशेष पोलिस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, ग्रामीण पोलिस अधीक्षक एस. पी. फडोळ यांच्या हस्ते करण्यात आला. कविता राऊत, मोनिका आथरे आणि प्रशिक्षक विजेंद्रसिंह यांचाही सत्कार झाला. या खेळाडूंना विशेष साहाय्य करणार्या महिंद्राचे हिरामण आहेर, चौधरी यात्राचे ब्रिजमोहन चौधरी, डॉ. प्रदीप पवार, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कर्नल एस. एस. सेहरावत यांनाही गौरवण्यात आले.
पप्पांकडे देणार
कारचा आनंद लपवू न शकणारी अंजना म्हणाली, ‘‘मला तर काही कार चालवता येत नाही, तसेच लायसन्सही नाही. पण, पप्पांना ट्रॅक्टर आणि ट्रकप्रमाणेच कारही चालवता येत असल्याने त्यांच्याकडे पाठवणार आहे.’’
कार प्रथमच मिळाली..
नाशिकमधून कविता राऊत, मोनिका आथरे यांच्यासह अनेक खेळाडूंनी चमक दाखवली असली तरी बक्षीस म्हणून कारचे भाग्य अंजनालाच मिळाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.