आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Slumps To Record Low; Closes In On 60 Dollar

PHOTOS : डॉलरची धमाल; रुपया बेहाल..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलरमध्येच जागतिक खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. भारतालाही जागतिक आयात-निर्यातीचे व्यवहार डॉलरमध्येच करावे लागतात. सध्या देशाला अत्यावश्यक असलेल्या क्रुड ऑईल आणि अनावश्यक असलेल्या सोने आयातीवर सर्वाधिक डॉलर खर्ची करावे लागत असून, त्यामुळे देशाच्या चालू खात्यात वित्तीय तूट वाढते आहे. यामुळे रुपयाची घसरण होते. क्रुड ऑईल प्रतिबॅरल 90 डॉलरपेक्षा जास्त दराने खरेदी करावा लागला की वित्तीय तूट वाढायला सुरुवात होते. सन 2007-08 मध्ये 2.3 टक्के, सन 2008-09 मध्ये 2.8 टक्के, सन 2011-12 मध्ये 4.2 टक्के तर सन 2011 -12 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 6.7 टक्के अशी वित्तीय तूट वाढत गेली आहे.