आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाची घसरण निर्यातीला लाभदायी - आशुतोष रारावीकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - डॉलर महागल्याने निर्यातदारांना फायदा होत असून यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळू शकणार आहे. त्यामुळे निर्यातदारांनी नवीन देशांतील बाजारपेठा काबीज कराव्यात, असे झाल्यास त्यातून देशाला मोठय़ा प्रमाणात विदेशी चलन उपलब्ध होऊ शकेल, असे मत रिझर्व्ह बॅँकेचे सहायक सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, शुक्रवारी डॉलरची किंमत 59.57 रुपये होती.

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने रिझर्व्ह बॅँक काय निर्णय घेऊ शकते हे जाणून घेण्यासाठी गुरुवारी रारावीकरांशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ‘एप्रिल 2013 पासून रुपयाची घसरण सुरू असून मे व जूनमध्ये ही घसरण 6.5 टक्के झाली. तसेच सर्वच देशांचे चलन घसरत आहे.’

हस्तक्षेपाला र्मयादा

सन 1993 पासून रिझर्व्ह बॅँकेने बाजारालाच डॉलर आणि रुपयाचे दर ठरविण्याचा अधिकार दिला आहे. खूपच वेगाने डॉलरची किंमत वाढल्यास आम्ही डॉलरचा पुरवठा वाढवतो. मात्र, त्याला र्मयादा आहेत.