आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टात दिवसामध्ये एक काेटींचे वितरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नेहमीच पाेस्टाच्या ‘अारडी’साठी रांगेत उभे असणारे ज्येष्ठ नागरिक.. तिकीट खरेदीसाठी येणारे ग्राहक गुरुवारी मात्र पाेस्टात चक्क पैसे बदलण्यासाठी रांग करून उभे हाेते. सकाळी वाजेपासूनच भल्या माेठ्या रांगा पाेस्टात लागलेल्या दिसत हाेत्या. जिवाचे रान करीत पाेस्ट कार्यालयापर्यंत पाेहोचल्यानंतर तसेच तहानभूक विसरून तासन््तास रांगेत उभे राहिल्यानंतर अचानकपणे पैसे संपल्याची सूचना जेव्हा रांगेपर्यंत पाेहोचत हाेती तेव्हा एकच संताप व्यक्त केला जात हाेता. सरकारी व्यवस्थेच्या नावाने बाेटे माेडतच अनेक जण रिकाम्या हाती परतत असल्याचे चित्र गुरुवारी (दि. १०) दिवसभर दिसले. मुख्य पाेस्ट कार्यालयासह नाशिकराेड येथील कार्यालयात सायंकाळपर्यंत पाेस्टाने सुमारे काेटी रुपयांचे वाटप केले.
चलनातून ५०० १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जुन्या नोटा बदली करण्यासाठी पोस्ट कार्यालयांत देखील व्यवस्था करण्यात आली. यामुळेच गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर पैसे बदलण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने दोन स्वतंत्र्य खिडक्यांची व्यवस्था करण्यात येऊन पैसे बदलून देण्यास पोस्ट कार्यालयामध्ये सकाळी १० वाजता प्रारंभ करण्यात आला. मात्र, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दीमुळे अवघ्या तासाभराच्या आत खिडक्या बंद करण्यात आल्या. सकाळपासून रांगा लावून उभे असलेल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, शहरातील पोस्ट ऑफिसच्या अन्य कार्यालयातही अशीच परिस्थिती असल्याने नागरिकांच्या अडचणीत अधिकच भर पडली. नोटा बदली करण्यासाठी टपाल विभागात पैसे संपल्याने विभागाच्या वतीने नागरिकांकडून फक्त पैसे जमा करण्यात अाले. सकाळपासून प्रतीक्षा करूनही पैसे मिळाल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत अनेकांनी वादही घातला.

जुन्या स्वीकारल्या, नव्यांची प्रतिक्षा
^५००१०००रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात आल्या असल्या तरी नवीन नोटा मात्र दिल्या नाही. बँकेकडे अजून नवीन नोटा उपलब्ध झालेल्या नाहीत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मोठी गैरसोय झाली. नवीन नोटा लवकर उपलब्ध करून द्याव्यात. -ज्ञानेश्वर भुसारे, ग्राहक

पोलिस बंदोबस्त तैनात
पैसेजमा करण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील मुख्य टपाल कार्यालय परिसरात पोलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी पैसे संपल्याने अनेकांनी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांकडे आपल्या व्यथा मांडल्या. मात्र, त्यांनी यासंदर्भात काही करण्यास असमर्थता दर्शवली.

सायंकाळी तिकिटे
^आमच्या संंस्थेसाठी तिकिटाची गरज आहे. मात्र, पोस्ट ऑफिसमधून ५००च्या नोटा चालणार नसल्याने तिकीट देण्यास नकार देण्यात आला. सायंकाळी ४.३० वाजता मात्र नवीन चलन उपलब्ध झाल्याने तिकिटे मिळालीत. -सुहास शिंदे

सकाळी पासून रांगेत
^पोस्टात नोटाबदली करण्यासाठी सकाळी वाजेपासून रांगेत उभा होतो. मात्र, अवघ्या एका तासात पैसे संपल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहना करावा लागत आहे. सामान्य लाेक त्रस्त अाहेत. -किशोर बस्ते.

पोस्टात भरणा वाढला
^पोस्टातभरणाभरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची गर्दी सर्वाधिक आहे. दैनंदिन ३० ते ४० हजारांचा भरणा होतो. मात्र, आज यात वाढ झाली. दोन ते अडीच लाखांचा भरणा विविध योजनांद्वारे जमा झाला. संजयलोले, पोस्ट अधिकारी, आडगाव.

अनेकांचा मुक्काम पोस्ट आॅफिसमध्येच
सकाळी एक तासातच वाटपासाठी पैसे संपल्याने टपाल विभागाच्या वतीने नागरिकांना केवळ फॉर्मचे वाटप करत तीन वाजेनंतर वाटप होईल, अशा सूचना देण्यात आल्या. मात्र, दुपारी तीननंतरही पैसे वाटप सुरू करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी पोस्ट ऑफिसमध्येच आपला मुक्काम ठोकला होता.

आर.डी. सेव्हिंग अकाउंटसाठी चालतील जुन्या नोट्या
चलनातूनरद्द झालेल्या नोटा पोस्टात जमा करता येईल, असे स्पष्ट करण्यात आल्याने नागरिकांनी पोस्टात पैसे जमा करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, पोस्टात केवळ आर.डी. सेव्हिंग अकाउंट असले तरच १००० ५०० च्या नोटा घेतल्या जातील, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे स्पीड पोस्ट, मनी आॅर्डर, कॅश ऑन डिलिव्हरी, तिकीट विक्रीसाठी नवीन नोटाच चालतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांचा हिरमाेड झाला.

सरकारी योजनांमध्ये केली गुंतवणूक
१००० आणि ५०० च्या नोटा बंद झाल्यानंतर अनेकांनी पोस्टात धाव घेत सुकन्या, आरडी, बचत आणि रिकरिंग खात्यात गुंतवणूक केली. एरवी रोज ३० ते ४० हजारांचा भरणार असणाऱ्या आडगावच्या पोस्टात आज सुमारे दीड ते दोन लाखांच्या ठेवी विविध योजनांमध्ये भरण्यात आल्या. दोन दिवस पोस्ट कार्यालय सुरू राहणार असल्याने ही रक्कम अधिक वाढण्याची शक्यता पोस्ट अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गडकरी चाैकात सारेच अनभिज्ञ (वेळ दु. १२.३० वा) : गडकरीचाैकातील पाेस्ट कार्यालयात लाेकांनी पैसे बदलण्यासाठी गर्दी केली हाेती. मात्र, पाेस्टाकडे पैसेच नसल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पैसे कधी उपलब्ध हाेतील, अशी विचारणा नागरिकांनी केल्यानंतर ‘अाम्हालाच माहीत नाही’, असे उत्तर देण्यात येत हाेते.

काॅलेजराेडलापैसेच नाही (दुपारी १.३० वाजता) : पाेस्टाच्याकाॅलेजराेड शाखेला ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने दुपारी १.३० वाजता भेट देऊन विचारणा केली असता येथे पैसेच उपलब्ध झालेले नसल्याचे उत्तर कर्मचाऱ्याने दिले, दाेन चार दिवसांनी सामान्यपणे नाेटा बदली करून मिळू शकतील, असा ‘माेलाचा’ सल्लाही मिळाला.

मुख्यटपाल कार्यालयात वादावादी (दुपारी ४.३० वाजता) : मुख्यटपाल कार्यालयात सकाळी ११ वाजताच पैसे संपून गेले हाेते. त्यामुळे पैसे दुपारी वाजता उपलब्ध हाेतील, असा सूचनाफलक कार्यालयात लावण्यात अाला हाेता. त्यामुळे नागरिकांच्या वाजेपासूनच कार्यालयात रांगा लागल्या हाेत्या. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय हाेती. पैसे बदलून मिळतील की नाही या धास्तीने अनेक नागरिकांनी कार्यालयात गाेंधळ घालण्यास सुरुवात केली हाेती. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. दुपारी ४.३० वाजता मात्र पैसे वाटप सुरू झाले.

ट्रेझरीतून रक्कम
^पाेस्टाकडेलाख९० हजार रक्कम अाली. नंतर ट्रेझरीकडून काेटी उपलब्ध झाले. सायंकाळी उशिरापर्यंत हे पैसे वाटण्यात अाले. ’’ -विवेकअहिरराव, सीनियर पाेस्ट मास्टर
कधी मिळतील हाे नवीन नाेटा? पाचशे हजारच्या नाेटा रद्द झाल्यामुळे अाधीच भांबावलेल्या नागरिकांची मुख्य टपाल कार्यालयात (जीपीअाे) बदली नाेटांसाठी सुरू असलेली प्रतीक्षा.
मुख्य टपाल कार्यालयात गुरुवारी सकाळपासूनच नागरिकांनी नाेटा बदलून घेण्यासाठी अशी गर्दी केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...