आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • S.Jagannathan Appointed As Nashik New Police Commissioner

पोलिस आयुक्तपदी एस. जगन्नाथन, कुलवंतकुमार सरंगल यांची अखेर नाशिकहून बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी मानवी हक्क आयोगातील (मुंबई) विशेष पाेलिस महानिरीक्षक एस. जगन्नाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाकडून शासकीय सुटीच्या दिवशी गुरुवारी (दि. २) सरंगल यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झाला. नूतन आयुक्त लागलीच शुक्रवारी सकाळी सरंगल यांच्याकडून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याचे कारण पुढे करीत बदली करण्यात आल्याचे दाखविले जात असले तरी यामागे महापालिका आयुक्तांशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला वादच सरंगल यांना भाेवल्याचे बाेलले जात आहे. त्याचप्रमाणे चाेवीस तासांच्या आत नवे आयुक्त पदभार स्वीकारत असल्याने यामागे राजकीय हस्तक्षेपाचीही चर्चा सुरू झाली आहे.
सरंगल यांनी १० फेब्रुवारी २०१२ राेजी शहर पाेलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली हाेती. तत्कालीन पोलिस आयुक्त विनोद लोखंडे यांच्यावर कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले हाेते. एेन महापालिका निवडणुकीच्या चार िदवस आधी सरंगल यांनी पदभार स्वीकारून गुन्हेगारी नियंत्रणासाठी दंडुका हाती घेतला हाेता. नूतन आयुक्त जगन्नाथन हे १९९१च्या आयपीएस तुकडीचे असून, गडचिराेली, उस्मानाबाद येथे पाेलिस अधीक्षक ते सीबीआयचे संचालक, इंटरपाेेलमध्ये सलग चार वर्षे सेवा त्यांनी बजावली आहे.

घराघरात पाेहोचल्यानेच झालाे यशस्वी
माझा माेबाइल क्रमांक नाशिककरापर्यंत पाेहाेचल्याने त्यांच्या घराघरात पाेहाेचलाे. रात्री-अपरात्री काॅल यायचे. त्याची दखल घेऊन माझ्या टीमनेही समस्या साेडविल्या. त्यामुळेच गुन्हेगारी नियंत्रणात यशस्वी ठरलाे. कुलवंतकुमारसरंगल, मावळतेआयुक्त

सिंहस्थाच्या सुरक्षिततेचे माेठे आव्हान
कुंभमेळ्यातभाविकांच्या सुरक्षिततेचे माेठे आव्हान आहे. त्यासाठी नियाेजन केले जाईल. एस.जगन्नाथन, नूतनपोलिस आयुक्त