आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Itakara Computer Expert, Latest News In Divya Marathi

‘वैचारिक तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञानाने देशाची नवनिर्मिती’-सचिन इटकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 66 वर्षे झाली, परंतु आजही आपण अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकलो नाही. जोपर्यंत मूलभूत बदल घडवत नाहीत, तोपर्यंत देशाची नवनिर्मिती होऊ शकणार नाही. देश महान होण्यासाठी वैचारिक तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन संगणकतज्ज्ञ सचिन इटकर यांनी केले.
य. म. पटांगणावर स्व. वि. ग. अकोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित नाशिक वसंत व्याख्यानमालेत 23वे पुष्प गुंफताना ‘निर्मिती नवभारताची, आव्हाने आणि युवकांची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी स्व. अकोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर रवींद्र डोमाळे, मधुकर अण्णा झेंडे, श्रीकांत बेणी, अरुण शेंदुर्णीकर, अ‍ॅड. चैतन्य शहा, संगीता बाफणा आदी उपस्थित होते. म्हसरूळ वसंत व्याख्यानमाला : म्हसरूळ येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना जिल्हा सत्र न्यायालयातील सरकारी वकील अ‍ॅड. शिवराम ठाकरे यांनी ‘स्वत:ला ओळखा’ या विषयावर विचार मांडले.
‘मनाला अस्तर देणारा तो मास्तर’, ‘आ+ईश्वर म्हणजे आई’ या सर्व गोष्टी समजून घेणे म्हणजे स्वत:ला ओळखणे होय, असे त्यांनी सांगितले. आई ईश्वराच्या ठिकाणी असते. आपण आईच्या पोटी जन्म घेतो म्हणजे आपल्यात ईश्वराचा अंश असतो, असे नाते त्यांनी सांगितले.