आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एज्युकेशन ऑन व्हील’ प्रयाेग ‘वर्ल्ड फोरम फॉर डेमॉक्रॉसी’त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -‘एज्युकेशन ऑन व्हील’ आणि ‘एव्हरी चाइल्ड काउंट’ या सामाजिक उपक्रमांद्वारे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या नाशिकच्या सचिन जोशी यांची युरोपियन कौन्सिलतर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड केली आहे.
फ्रान्स देशातील स्ट्रासबर्ग या शहरात येत्या नोव्हेंबर रोजी वर्ल्ड फोरम फॉर डेमॉक्रॉसी ही जागतिक परिषद अायाेजित करण्यात येणार आहे. या परिषदेचा यंदाचा विषय ‘लोकशाही आणि समानता-शिक्षणाची भूमिका’ असा आहे.

जगभरातील देशांमध्ये लोकशाही व्यवस्था बळकट व्हावी, या उद्देशाने युरोपीयन कौन्सिलतर्फे गेल्या वर्षांपासून ‘वर्ल्ड फोरम फॉर डेमॉक्रॉसी’ ही जागतिक परिषद भरविली जाते. या परिषदेत तब्बल ४७ देशांतील प्रतिनिधी सहभागी होत असतात. परिषदेचा या वर्षीचा विषय शिक्षण हा असून, जगभरात नावीन्यपूर्ण शिक्षणविषयक उपक्रम राबविलेल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात नाशिकच्या सचिन जाेशी यांनाही त्यांच्या ‘एज्युकेशन अाॅन व्हील’ या प्रयाेगासाठी परिषदेसाठी अामंत्रित करण्यात अाले अाहे. त्यामुळे हा महत्त्वूपर्ण प्रयाेग अाता सातासमुद्रापार पाेहाेचणार अाहे.
शाळाबाह्य मुलांसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प...
नाशिकच्या सचिन जोशी यांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘एज्युकेशन ऑन व्हील’ आणि ‘एव्हरी चाइल्ड काउंट’ या संकल्पनांच्या माध्यमातून अातापर्यंत अनेक मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून साक्षरतेबरोबरच समानता संस्कार रुजविणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रयोगाची दखल अाता युरोपियन कौन्सिलने घेतली असून, जोशी यांची या परिषदेसाठी निवड करण्यात अाल्याने नाशिकसाठी ही गाैरवाची बाब ठरणार आहे.

लोकशाहीच्या बळकटीसाठी उपयुक्त
शिक्षण क्षेत्रातील बदलांबरोबरच लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यासाठी सचिन जोशी यांची निवड होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच, सचिन जोशी यांना राज्यघटनेच्या पुस्तकाची प्रतही बाम यांनी भेट दिली. लोकशाही मूल्य जपण्यासाठी तळागाळापर्यंत अभिनव संकल्पना युरोपियन कौन्सिलतर्फे राबविण्यात येत असतात.
बातम्या आणखी आहेत...