आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देह अपंग, इच्छा अभंग- सचिन साळवेंचा ‘एकलव्य ते द्रोणाचार्य’ प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- ऐन तारुण्यात असाध्य आजाराने ग्रासलेले असताना न डगमगता ‘एकलव्य’ बनून शिक्षण घेतले. ध्येयाचा अचूक वेध घेत ‘अर्जुन’ झाले आणि विद्यादानामुळे आज द्रोणाचार्य म्हणून ते ओळखले जात आहेत. एकलहरे कॉलनीतील बास्केटबॉल प्रशिक्षक सचिन रतन साळवे (34) यांची ही खरीखुरी कहाणी एकलव्याप्रमाणेच रोमांचकारी आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीला असलेल्या वडिलांचे अकाली निधन झाले. सचिन त्यावेळी लहान असल्यामुळे कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी आई कारखान्यात रोजंदारीवर काम करू लागली. सचिनने एकलहरे गावात प्राथमिक, तर बिटको महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. बास्केटबॉलच्या आवडीमुळे तो त्यात माहीर झाला; मात्र स्पर्धेत भाग घेण्याचे वय निघून गेले होते.
अकाली अपंगत्व

धावपळ, स्पर्धांमध्ये नाव कमावण्याच्या वयातच 23व्या वर्षी सचिनचे गुडघे दुखू लागले. पाय कडक झाले. खर्चिक उपचारासाठी नाशिकरोड यू. एस. जिमखाना, के. एन. केला शाळेच्या शिक्षकांनी मदत केली. मांसपेशीतील तंतूची ताकद कमी करणारा आजार असल्याचे व जगात त्यावर उपचार नसल्याचे पुण्याच्या वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. थेम्स थेरपीनंतर काही दिवस बरे वाटले; पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. पायाची ताकद कमी होऊ लागली. खुर्चीवर बसता येणेही अशक्य झाले. शरीराला ताण न देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; पण सचिन न डगमगता या परिस्थितीशी लढा देत आहे.
सचिनने अकाली आलेल्या अपंगत्वाकडे दुर्लक्ष करून एकलव्याप्रमाणे नाशिक जिमखान्यावर तासन्तास खेळ बघून प्रशिक्षणाचे धडे घेतले. एकलहरे परिसरात मोफत बास्केटबॉलचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. 1996-97 मध्ये सुरू झालेल्या वर्गांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. सचिनच्या प्रशिक्षणाचा अल्पावधीत शहरभर प्रसार झाला. नाशिकरोडच्या यू. एस. जिमखानाच्या पदाधिकायांनी जिमखान्यावर प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव त्याने मान्य केला.
आज 90पेक्षा अधिक खेळाडू त्याच्याकडे प्रशिक्षण घेत असून, निम्म्यापेक्षा अधिक खेळाडू जिल्हा, राज्य व राीय स्तरावर नाशिकचे व देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
शिष्यांनी मिळवले सुवर्ण
प्रशिक्षणातून कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने त्याने के. एन. केला शाळेत क्रीडाशिक्षक म्हणून नोकरी पत्करली. पहिल्याच वर्षी शाळेची चार मुले, चार मुली राज्यस्तरावर चमकले. साई अकादमीच्या स्पर्धेत त्याने प्रशिक्षित खेळाडू सुवर्णपदक कमावले. भारतीय सरावासाठी रोहन जगताप, राीय स्तरावर राहुल साळवे यांची निवड झाली. इंदूरच्या राष्टÑीय कॉर्पोरेट स्पर्धेत सिद्धार्थ शेजवळने रजत पटकावले. विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेत शाळेचे, तर प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थी नाशिकचे नाव मोठे करीत आहेत.
खेळाडूंचा अभिमान वाटतो
जिल्हास्तरापासून राष्‍ट्रीय स्तरावर माझे खेळाडू एकता लुथरा, नयन सातभाई, गायत्री टिळे, प्रांजल पाटील, अनुप पंचभाई, श्रेयस साळुंके, तन्मय वाघ, मेघा काळे, निकिता चमनकर प्रतिनिधित्व करीत आहेत. जिमखान्यावर प्रशिक्षण वर्ग सुरू असला तरी एकलहरेत नि:शुल्क प्रशिक्षण वर्ग बंद केलेला नाही.
सचिन साळवे, प्रशिक्षक, बास्केटबॉल