आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरे अात्महत्या प्रकरण : सीआयडीकडून साडेतीन हजार पानी अहवालाची छाननी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या तपासात सुमारे साडेतीन हजार पानांचा अहवाल तयार केला आहे. या अहवालातील प्रत्येक पानाची छाननी सीआयडीच्या पथकाकडून केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांना आरोपींसह निरीक्षक सादरे यांच्याविरोधात असलेल्या आरोपांचीही स्वतंत्र चौकशी करावी लागणार असल्याने हा तपास गुंतागुंतीचा असल्याचे सीआयडीच्या तपासाधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये सादरे आत्महत्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वषेण (सीआयडी)कडे सोपवण्यात आला. शनिवारी दुपारीच नाशिक पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात प्राप्त केलेले पुरावे, संशयितांविषयीची माहिती, घटनाक्रम, पंचनामे यांसह विविध कागदपत्रांचे सुमारे साडेतीन हजार पानांचा अहवाल सीआयडीचे तपासाधिकारी उपअधीक्षक के.डी.पाटील यांना सोपवला. या तपासात सादरे यांच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीतील मजकुराची शहानिशा करण्याबरोबरच जाबजबाब नोंदवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...