आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धांतून हाेताे शारीरिक विकास, साधना देशमुख यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शालेयजीवनात अभ्यासाबराेबरच खेळालादेखील महत्त्व देणे गरजेचे अाहे. अभ्यासातून बाैद्धिक विकास हाेताे, तर क्रीडास्पर्धांतून शारीरिक विकास हाेताे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने राेज अभ्यासाबराेबरच खेळालाही प्राधान्य द्यायले हवे, असे अावाहन एस.एम.अार.के. महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या साधना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले.
गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या माधवराव लेले विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महाेत्सवाच्या पारिताेषिक वितरणात त्या बाेलत हाेत्या. व्यासपीठावर दिलीप महामिने, मुख्याध्यापक विनाेद देशपांडे उपस्थित हाेते. याप्रसंगी क्रीडाप्रमुख विष्णू अाव्हाड यांनी क्रीडा अहवालाचे वाचन केले. महाेत्सवाचे उद‌्घाटन एचपीटी-अारवायके महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. डब्ल्यू. उगले यांच्या हस्ते झाले. महाेत्सवात वैयक्तिक प्रकारात धावणे, अडथळा शर्यत, तीन पायाची शर्यत, चमचा लिंबू, गाेणी शर्यत या स्पर्धांसह सांघिक प्रकारात कबड्डी, खाे-खाे, लंगडी, हत्तीची साेंड अादी स्पर्धा झाल्या. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र पारिताेषिक देऊन गाैरविण्यात अाले. सूत्रसंचालन मेघना अाहिरे यांनी केले. अश्विनी शिंदे यांनी अाभार मानले. यावेळी शिक्षकवृंद, कर्मचारी मान्यवर उपस्थित हाेते.
व्यायाम अाणि अाहारही गरजेचाच : महामिने
पारिताेषिक वितरण साेहळ्याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे महामिने यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला, शिवाय सकस अाहारही घेण्याचे अावाहन केले.
बातम्या आणखी आहेत...