आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर या साध्वी कुणाच्याही चारित्र्यावर उडवतील शिंताेडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाखाडापरिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्यावर साध्वींनी केलेल्या विनयभंगाच्या अाराेपांमुळे सर्व साधू समाज संतप्त झाला अाहे. वादाचा ताे प्रकार सगळ्या जगासमाेर घडूनही साध्वीने केलेला अाराेप हा साधू समाजाची प्रतिष्ठाच धुळीस मिळवणारा अाहे. या साध्वी साधुग्राममध्ये राहिल्यास त्या कुणावरही विनयभंगासारखा लांच्छनास्पद अाराेप करतील. त्यामुळे त्यांना काेणत्याही स्थितीत नाशिकच्या साधुग्राममध्ये राहू देण्याचा इशारादेखील साधूंकडून प्रशासनाला देण्यात अाला अाहे.

संपूर्ण साधू समाज अध्यक्षांवरील अाराेपांमुळे एकवटला असल्याचे दिगंबर अाखाड्याचे श्री महंत कृष्णदास यांनी नमूद केले. वादाचा जाे प्रकार घडला ताे मुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रसारमाध्यमे अाणि सर्व जनतेसमाेर घडला. त्याबाबत साध्वीने अध्यक्ष महंत ग्यानदास महाराजांविरुद्ध कुभांड रचून विनयभंगाचा अाराेप केला. ताे किती धादांत खाेटा अाहे, हे प्रत्येकाला माहिती अाहे. तरीदेखील महिला म्हणून त्या साध्वीचीच बाजू ताेलून धरण्याचे काम प्रशासनासह सारे जण करीत अाहेत. जर ती साध्वी सगळ्यांसमाेरच्या प्रकाराबाबतही कुभांड रचून अाराेप करू शकते, तर ती उद्या कुणावरही अाराेप करेल. त्यामुळे ही साध्वी साधुग्राममध्ये अाम्हाला नकाेच अाहे, अशा स्पष्ट शब्दांत श्री महंत कृष्णदास महाराज यांनी साध्वीबद्दलचे मत स्पष्टपणे मांडले.

अाता कुंभमेळ्यासाठी तयारीकरिता वेळ कमी उरला असल्याने प्रशासनाने जे दिलंय, तेवढ्यातच भागवावे लागणार अाहे. पण, प्रशासनाने अजून एक प्लाॅट देण्याचे मान्य केले अाहे. त्याशिवाय, महिलांच्या स्नानासाठी एक स्वतंत्र घाटदेखील देण्याचा शब्द प्रशासनाकडून देण्यात अाला अाहे. ‘अब जाे है, वाे ठिक है, उसमें क्या खुश अाैर क्या नाराजगी रहेगी? कुंभमेळा शांततेत पार पाडायचा असल्याने अाता खटला दाखल करणे किंवा अन्य काहीही करण्याबाबत कुंभ संपल्यानंतरच विचार करेन. साध्वीत्रिकाल भवन्ता, महिला परी अाखाडा
साध्वी त्रिकाल भवन्ता यांना प्रशासनाच्या वतीने साधुग्राममध्ये सेक्टर मध्ये प्लाॅट क्रमांक २५ अाणि २६ देण्यात अाले अाहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे हजार चाैरस फूट अाहे. यापूर्वी प्रशासनाने दिलेली प्लाॅटची जागा अन्य अाखाड्यांना तसेच साध्वींनादेखील मान्य नसल्याने ती बदलण्यात अाली अाहे.

साध्वींना धार्मिक संस्थांच्या जागेत दाेन प्लाॅट
साध्वी अन्यदेखील अाहेत
एकतरया साध्वींना काेणतीच परंपरा नाही, गुरू नाही. त्यात त्या वैष्णवदेखील नाहीत. अन्य अाखाड्यांमध्येही साध्वी अाहेत. त्यांना वेगवेगळी पदेदेखील दिलेली अाहेत, तरीही काेणत्याही साध्वीने कधी असे धादांत असत्य अाराेप केलेले नाहीत. मग प्रशासन त्यांना इतके ताेलून का धरत अाहे? त्यामागे कुणाचा हात अाहे, असा सवालदेखील श्री महंत कृष्णदास अाणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून विचारला जात अाहे.

अत्यंत गलिच्छ स्वरूपाचे अाराेप
साध्वीत्रिकाल भवन्ता यांनी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ध्वजाराेहण साेहळ्यात भर व्यासपीठावर माइक हातात घेऊन करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे वाद घालण्याची जागा चुकीची असल्याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न महंत ग्यानदास महाराज यांनी केला हाेता. हा प्रकार सर्व जगासमाेर घडलेला असतानाही साध्वींनी विनयभंगासारखा अत्यंत गलिच्छ स्वरूपाचा अाराेप अध्यक्षांवर केल्याबद्दल सर्वच अाखाडे अाणि खालसेप्रमुखांमध्ये तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया उमटली अाहे. साध्वींनी अाराेप करताना निदान थाेडे तरी तारतम्य बाळगायला हवे हाेते, असा सूर उपस्थित खालसेप्रमुख अाणि अन्य अाखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील या वेळी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...