आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राममधील ‘हातसफाई’ची स्थायी समितीकडून पाेलखाेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्रामच्या स्वच्छतेच्या पाच काेटी रुपयांच्या वादग्रस्त ठेक्याने शुक्रवारी नवीनच वळण घेतले असून, स्थायी समितीने पर्यायी व्यवस्था म्हणून तिसऱ्याच ठेकेदारामार्फत नेमलेल्या १३२० कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी पाहणी केली असताना बाेटावर माेजण्याइतकेच कर्मचारी जागेवर अाढळले. वस्तुत: तब्बल चार तास अाधी सर्व कर्मचारी हजेरीसाठी तयार ठेवा, असे स्थायी समिती सभापतींचे अादेशही धुडकावण्यात अाले. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, ३५ टक्के जादा दराने काम देण्याच्या कृतीचे समर्थन म्हणून कर्मचाऱ्यांना गणवेश, जॅकेट, गमबूट, मास्क अन्य सुविधा दिल्या जातील, असे अायुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण कागदावरच असल्याचे समाेर अाले.

स्थायी समितीच्या सभेत साधुग्रामच्या स्वच्छतेचा मुद्दा चांगलाच गाजला. या सभेत अाराेग्य विभागाने नेहमीप्रमाणे दिशाभूल करणारी उत्तरे दिल्यानंतर समिती सदस्यांनी अखेर या प्रकरणाचा साेक्षमाेक्ष लावण्याचे ठरवले. त्यातून पर्यायी व्यवस्था म्हणून लावलेल्या १३२० कर्मचाऱ्यांना समितीसमाेर हजर करण्याचे अादेश सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले. दुपारी वाजता सूचना देत वाजेपर्यंत तयारी करा, अशा सूचना केल्या. त्यानुसार स्थायी समितीने साडेचार वाजेच्या सुमारास साधुग्राममध्ये पाहणी सुरू केली. या वेळी प्रा. कुणाल वाघ, मेघा साळवे, शेख रशिदा, रत्नमाला राणे, नीलिमा अामले, छाया ठाकरे यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य उपस्थित हाेते.

स्थायीततीन तासांचा खल : दरम्यान,स्वच्छतेच्या ठेक्यावरून स्थायी समितीत तब्बल तीन तासांचा खल झाला. न्यायालयात सुनावणी सुरू असताना परस्पर तिसऱ्याच ठेकेदाराला काेणत्या अधिकारात काम दिले, असा सवाल करण्यात अाला. त्यावर अायुक्तांच्या विशेषाधिकारात १४ क्रमांकाची अट टाकून पर्यायी व्यवस्था केल्याचा खुलासा अाराेग्यधिकाऱ्यांनी केला. त्यावर १४ क्रमांकाच्या अटीचा तपशील सादर करण्यावरून सदस्यांनी काेंडीत पकडले. दरम्यान, याच वेळी स्थायी समितीवर वाॅटरग्रेसबाबत केलेला खुलासा त्या अनुषंगाने स्थायी समितीने घेतलेला निर्णय याेग्य हाेता का, याविषयी अतिरिक्त अायुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती झाली. त्या वेळी त्यांनी अापले पत्र याेग्यच असल्याचे सांगत वैयक्तिक मत म्हणून त्या अाधारावर स्थायी समितीने घेतलेला निर्णय याेग्यच हाेता, अशी पुष्टी दिल्याने प्रशासनाचे पितळ उघडे पडले.

अाॅनलाइन हजेरीची पडताळणी
^महापालिकेकडे टॅबद्वारे प्रत्येक कर्मचाऱ्याची दररोजची हजेरी प्राप्त हाेत असून, ही यादी घेऊन कधीही संबंधित कर्मचारी खराेखरच जागेवर अाहे का, याची पडताळणी करता येईल. कर्मचाऱ्यांचे वेतन परस्पर काेणी काढणार नाही, याची तजवीज करण्याचा प्रयत्न करू. ठेकेदार दाेषी असेल, तर त्यावर कठाेर कारवाई करू. जीवनसाेनवणे, अतिरिक्त अायुक्त, महापालिका

महापालिकेचे पितळ उघडे
साधुग्राममधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साध्या शेडची माहिती अाराेग्यधिकाऱ्यांनी नाही. कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुविधांच्या नावाखाली दिलेले ३५ टक्के जादा दराचे पैसेही गायब झाले अाहेत. १३२० कर्मचाऱ्यांच्या नावाखाली १३ कर्मचारीही दिसले नाहीत. एकूणच प्रकार धक्कादायक गंभीर असून, सर्वांसमाेर महापालिकेचे पितळ उघडे पडले. शिवाजीचुंभळे, सभापती, स्थायी समिती

३५ टक्के जादा दराचे पैसे काेठे?
३५टक्के जादा दराने काम देण्यामागचे स्पष्टीकरण म्हणजे, कर्मचाऱ्यांना बँकेत खाते द्यायचे, त्यांची टॅबद्वारे हजेरी घ्यायची, गमबूट अन्य सुरक्षा साहित्य द्यायचे, असे सांगण्यात अाले. प्रत्यक्षात सुरक्षा साहित्याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे ३५ टक्के जादा रक्कम काेणाच्या खिशात गेली, असा सवाल केला. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी तत्काळ ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे अादेश दिले.

वेतननाही, लंगरमध्ये जेवण
परप्रांतापासूनतर स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महिनाभरापासून वेतन मिळाले नसल्याचे सांगितले. ठेकेदाराने बँकेत खाते उघडून एटीएम िदले. मात्र, कसे चालवायचे तेच माहिती नसल्याची कैफियत सदस्यांसमाेर मांडली. वेतन नसल्यामुळे लंगरमध्ये जेवण करावे लागते, असेही सांगितले.

नरेंद्र महाराजांच्या शिष्यांकडून साफसफाई
महापालिके मार्फत लावण्यात आलेले कर्मचारी घाेळके करून एकत्र सफाईसाठी फिरताना दिसले. गणवेश नसल्यामुळे त्यांना अाेळखणेही अवघड हाेते. प्रत्यक्षात येथेच जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या शिष्यांकडून माेफत साफसफाई सुरू हाेती. जवळपास एक हजार शिष्य चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने माेफत सफाईचे काम करीत असल्याचे बघून स्थायी समितीला झटका बसला. प्रारंभी संबंधित शिष्यांकडे जॅकेट, हातमाेजे, मास्क अादी साहित्य असल्यामुळे ठेकेदारामार्फत महापालिकेचे काम याेग्य पद्धतीने सुरू असल्याचा सदस्यांचा ग्रह झाला. मात्र, हे कर्मचारी ठेकेदाराचे नव्हे, तर नरेंद्र महाराज यांचे शिष्य असल्याचे समजल्यावर त्यांनी डाेक्याला हात मारून घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.