आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपूजनासाठी साधू-महंत निघाले परतीच्या प्रवासाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गुरुपौर्णिमा उत्सव दि. ३१ जुलैला साजरा हाेणार असून, तपाेवनात अालेले साधूही अापल्या गुरूंच्या दर्शनासाठी गुरुस्थानी निघाले अाहेत. त्यामुळे अाता पुन्हा एकदा तपाेवनातील वर्दळ कमी झाल्याचे दिसत अाहे. अाॅगस्ट महिन्याच्या पहिल्या अाठवड्यापासूनच विविध अाखाड्यांचे ध्वजाराेहण हाेणार असल्याने या काळात पुन्हा एकदा साधुग्राम साधूंच्या गर्दीने फुलून जाणार अाहे.
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजाराेहणाच्या निमित्ताने देशभरातून विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान येथून माेठ्या प्रमाणात साधू तपाेवनात अाले हाेते. यातील अनेकांनी ध्वजाराेहण कार्यक्रमाला अाणि त्यापूर्वी झालेल्या मिरवणुकीत उपस्थिती लावली. प्रशासनाने साधुग्राममध्ये दिलेली जागा ताब्यात घेण्यासाठी साधूंनी तपाेवनात हजेरी लावली हाेती. त्यानंतर साेयी-सुविधांचा अाढावा घेण्यासाठी या साधूंनी मुक्काम ठाेकल्याने त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनीही गर्दी केली हाेती. शनिवार अाणि रविवारच्या सुटीच्या दिवशी तर तपाेवनात गर्दीचा महापूर दिसत हाेता. त्याचे प्रतिबिंब अनेकांच्या फेसबुक अाणि व्हाॅट‌्सअॅपच्या वाॅलवर उमटले. या दरम्यान साधू-महंतांबराेबर काढलेली छायाचित्रे सर्वत्र फिरलीत. एकीकडे तपाेवनात साधूंच्या दर्शनासाठी गर्दी हाेत असतानाच अाता साधू मंडळी येत्या ३१ जुलैला साजऱ्या हाेणाऱ्या गुरुपाैर्णिमेच्या निमित्ताने परतीच्या प्रवासाला निघाली अाहेत. प्रत्येक अाखाड्यांना गुरूंची माेठी परंपरा अाहे. या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साधू-महंतांनी गुरू स्थानाकडे प्रस्थान केले अाहे. अाखाड्याचे ध्वजाराेहण पहिल्या पर्वणीसाठी ते पुन्हा तपाेवनात येणार अाहेत. येत्या दि. अाॅगस्टपासून तपाेवन पुन्हा एकदा साधू-महंतांनी बहरून जाईल, असे बाेलले जात अाहे.
साधुग्राममधील जागेचा अाढावा घेऊन अनेक साधू माघारी फिरत अाहेत. काही वाहनाने तर काही थेट दुचाकीनेच अापल्या गुरुस्थानाकडे निघाले.

गुरू दर्शनासाठी निघालाे...
गुरुपौर्णिमा अामच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अाहे. त्यामुळे अाम्ही सर्वच साधू गुरूंच्या दर्शनासाठी जाणार अाहाेत. त्यानंतर पहिल्या पर्वणीसाठी अाम्ही पुन्हा तपाेवनात दाखल हाेऊ. सर्वेश्वरदासत्यागी महाराज, दिगंबर आखाडा, चित्रकूट धाम

गुरुपाैर्णिमेचे महत्त्व असे...
चारहीवेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची गुरुपाैर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. त्यामुळे त्यांना आद्यगुरू मानले जाते. गुरू परंपरेशिवाय साधुत्व प्राप्तच हाेत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळेच साधू समाजात गुरुपाैर्णिमेला अत्याधिक महत्त्व अाहे.

प्रशासनासाठी सुगीचा काळ
साधुग्राममध्येअजूनही पुरेशा साेयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. काही साधूंनी तर सुविधा मिळाल्या नाहीत तर अांदाेलनाचा इशाराही दिला अाहे. गुरुपाैर्णिमेनिमित्त साधू परतीच्या प्रवासाला लागले असल्याने हा काळ प्रशासनाला उर्वरित नियोजन करण्यासाठी सुगीचा ठरणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...