आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhu Sant Become Big Due To Political Leaders And Government Support

राजकीय नेते, पुढाऱ्यांच्या राजाश्रयामुळेच कथित साधू- संत माेठे झाल्याचा अाराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अासाराम बापू, स्वामी नित्यानंद, शिवमुरत द्विवेदी ऊर्फ इच्छाधारी बाबा यांसारख्या साधूंंवर लैंगिक अत्याचाराचे अाराेप झाले अाहेत. असे बहुतांश तथाकथित साधू जेलची हवा खात अाहेत. साधू समाज या घटनांकडे कसे पाहताे, याविषयी षड‌्दर्शन अाखाडा परिषदेचे प्रवक्ते डाॅ. बिंदू महाराज यांच्याशी केलेली बातचीत.

गेल्या काही वर्षांत अनेक साधू-संतांवर लैंगिक छळाचे अाराेप झाले अाहेत, याविषयी अापले मत काय?
मुळात ज्यांच्यावर अाराेप झाले अाहेत ते साधू वा संत नाहीत, ही बाब प्रकर्षाने लक्षात घ्यावी. भगवे वस्त्र परिधान केले अाणि दाढी वाढवली म्हणजे काेणी व्यक्ती साधू वा संत हाेत नाही. साधू बनण्यासाठी कठाेर तपश्चर्या करावी लागते. त्यासाठी गुरूंची दीक्षाही घ्यावी लागते. पण, ज्यांच्यावर अाराेप झाले त्यांना कोणतीही गुरू परंपरा नाही. त्यामुळे अाम्ही त्यांना साधू वा संत मानतच नाही. स्वयंघाेषित बनलेले संत वा साधूंकडून अशा प्रकारचे गैरकृत्य घडले अाहे. जैसी करणी, वैसी भरणी या उक्तीप्रमाणे या कृत्याची शिक्षा त्यांना भाेगावीच लागणार अाहे, अासाराम बापू हे काही संत नाहीतच. साधू, संत म्हणजे सद‌्वर्तन करणारा. या व्याख्येलाच छेद देण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला अाहे. संत कबीर यांनी म्हटलेच अाहे, ‘मन ना रंगाए, रंगाए जोगी कपडा.’
अशा ढाेंगी साधूंबाबत शासनाची भूमिका काय असावी, असे तुम्हाला वाटते?
शासनच ढोंगी अाहे. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षाही करता येणार नाही. ज्यांवर लैंगिक छळाचे अाराेप झाले त्यांच्या संपर्कात किती मंत्री, पुढारी हाेते यांचा अभ्यास करावा. पुढा-यांच्या राजाश्रयामुळेच हे लाेक माेठे झालेे.
पण शासनाचेही अशा लाेकांवर नियंत्रण नसेल तर या गाेष्टी वाढतीलच?
लखि सुबेष जग बंचक जेऊ।
बेष प्रताप पूजिअहिं तेऊ॥
उघरे अंत न होइ निबाहू।
कालनेमि जिमि रावन राहू॥
याचा अर्थ असा की, एखाद्या ठकाने साधूचा वेश परिधान केला तर या वेशामुळे जग त्याची पूजा करते. परंतु, एक ना एक दिवस सत्य उघडकीस येतेच. शेवटपर्यंत अशा प्रकारचे कपट कधीच टिकत नाही. कालनेमी राक्षस, रावण अाणि राहू यांचेही असेच हाल झाले हाेते. त्याप्रमाणे प्रत्येक अपप्रवृत्तीचा अाणि अशी प्रवृत्ती बाळगणा-यांचा याच जन्मी नाश हाेणार हे निश्चित अाहे.