आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राममधील जागावाटप वादातच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तपोवनपरिसरात साडेतीनशे एकरांत साकारण्यात आलेल्या साधुग्राममधील जागावाटपाचा वाद अद्यापही कायम आहे. एकीकडे ध्वजारोहणाने सिंहस्थ पर्वास सुरुवात झाली असताना दुसरीकडे मात्र आखाड्यांचा जागावाटपाचा घोळ मिटत नसल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
\\
साधू-महंतांच्या सोयी-सुविधांसाठी तपोवन परिसरातील साडेतीनशे एकरांत भव्य असे साधुग्राम साकारण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच तपाेवन परिसरातील साधुग्रामचा सुरू झालेला वाद ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतरही मिटत नसल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
परिणामी, देशभरातून दाखल झालेल्या साधू-महंत, आखाडे, धार्मिक संस्था यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.