आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साध्वींचा स्वतंत्र स्नानाचा दावा कोर्टाने फेटाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साध्वी त्रिकाल भवंता यांनी साधू-महंतांच्या आखाड्याप्रमाणे महिलांच्या परी आखाड्यालाही पर्वणीकाळात शाहीस्नानासाठी स्वतंत्र कुंड आणि वेळ देण्याच्या मागणीसाठी न्यायालयात दाखल केलेला दावा अखेर गुरुवारी फेटाळण्यात आला. तसेच स्त्री-पुरुष असा भेद बाळगता प्रशासनाच्या नियोजनानुसार सामान्य भाविकांप्रमाणे स्नान करण्याचे निकालात म्हटले आहे.

स्वतंत्र कुंडाच्या दाव्याबाबत विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करताना साध्वी भवंता यांचा कुठलाही आखाडा अथवा खालसा नाही. साध्वींची परंपराही नाही. केवळ कंपनी कायद्यानुसार संस्था आहे. देशभरात अशा किमान ५३१ संस्थांची नोंदणी आहे. याप्रमाणे या कंपन्याही मग मागणी करतील, असे झाल्यास भाविकांना वेळ मिळणार नाही. सिंहस्थ कुंभमेळा जागतिक पातळीवरील महोत्सव आहे. यासाठी प्रशासनाने तीन वर्षांपासून सूक्ष्म नियोजन केले आहे.
साध्वींना स्वतंत्र वेळ दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, असे मिसर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीश राजेश पटारे यांनी सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरत हा दावा फेटाळला. साध्वींनी सामान्य भाविकांप्रमाणे स्नान करण्याचा आदेश दिला. प्रशासनातर्फे महेश पाटील, रघुनाथ गावडे यांची साक्ष झाली. आखाड्यांचे वकील एम. डी. कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्रिकाल भवंता यांच्या वतीने अॅड. प्रशांत जोशी यांनी बाजू मांडली.