आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधूंना काढावा लागणार पाच किलाे धान्यावर महिना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थासाठी प्रशासनाकडून एका साधूकरिता महिन्याला अर्धा किलाे साखर, दाेन किलाे तांदूळ तीन किलाे गहू एवढे धान्य एपीएलच्या दराने पुरविले जाणार अाहे. मात्र, एवढ्या अल्प धान्यावर कसा महिना काढायचा, असा प्रश्न साधूंनी उपस्थित केला अाहे. प्रशासनाने अशा अल्प स्वरूपाच्या धान्य काेट्याची घाेषणा करून एकप्रकारे साधूंची चेष्टाच केली असल्याची संतप्त प्रतिक्रिया साधंूनी व्यक्त केली अाहे.
कुंभमेळा काळात या सोहळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांना ‘एपीएल’च्या दरानेच धान्य दिले जाणार आहे. त्याची सबसिडी सिंहस्थ कक्षाने द्यावयाची असून, ती पुरवठा विभागाला वितरितही करण्यात आली आहे. खालशांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्य देण्यात येत आहे. मात्र, यामध्ये प्रथम ही सबसिडी किती द्यावयाची, यावरून प्रश्न उपस्थित झाले. शिवाय, सबसिडीची रक्कम कोण अदा करणार, हाही मुद्दा उपस्थित झाला होता. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला. मात्र, त्यावर तोडगाच निघाला नाही. अखेर राज्य शासनानेच त्यात निर्णय घेत ‘एपीएल’च्या दराने धान्य देण्यावर शिक्कामोर्तब केले.

आखाडाअन‌् खालसा दाेघांचे एकत्र कार्ड
आतासाधूंना रेशनकार्ड देण्यात येत आहे. आखाडा आणि त्यांचे खालसे मिळून हे कार्ड एकत्र दिले जाणार असून, त्यावरच प्रमुख साधूंनी आखाडे किंवा खालशातील संख्या नोंदवायची आहे. त्यानुसार संबंधितांना धान्याचा पुरवठा केला जाणार आहे, तर शासनाला देण्यात येणारी सबसिडीची रक्कम मात्र सिंहस्थ कुंभमेळा कक्षातर्फे जिल्हा पुरवठा विभागाला दिली आहे. त्यामुळे आता सिंहस्थात साधू-महंतांच्या धान्याबाबतचा पेच मिटला आहे.

2003 च्या कुंभची स्थिती
{02 हजारक्विंटल धान्य नाशकातील साधूंना पुरविले हाेते {200 क्विंटल धान्य त्र्यंबकच्या साधूंना लागले हाेते.
साधूंना अन्न शिजविण्यासाठी २५ हजार गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. हे सिलिंडर घरगुती दरानेच अर्थात, सबसिडीच्या दरातच उपलब्ध होतील. अनुदानाची रक्कम राज्य शासन संबंधित एजन्सीला वितरित करणार आहे. त्यासाठी संबंधित आखाडा आणि त्यांच्या खालशांना मात्र रितसर रेग्युलेटर घेऊन नवे गॅस कनेक्शन घ्यावे लागणार आहे.

अनुदानित सिलिंडर मिळेल
यंदा सिंहस्थासाठी तीन हजार ५०० मेट्रिक टन धान्यसाठा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी १७६६ मेट्रिक टन धान्याची ‘एफसीआय’कडून पुरवठा विभागाने उचलही केली आहे. त्यात २१०० मेट्रिक टनांपैकी ६४४ मेट्रिक टन गव्हाची उचल झाली आहे, तर १४०० मेट्रिक टनांपैकी ११२२ मेट्रिक टन तांदूळही पुरवठा विभागाने उचलला आहे.

१७६६ मेट्रिक टन धान्याची उचल
06 दुकाने नाशिक साधुग्राममध्ये
02 दुकाने त्र्यंबकेश्वरमध्ये
34,000 क्विंटल धान्य मंजूर
1766 मे. टन धान्य पुरवठा एफसीअायकडून
25,000 गॅस सिलिंडर देणार
धान्य दुकाने
असा हाेणार पुरवठा
महिन्यासाठी मंजूर शिधा
02किलाे तांदूळ
03 किलाे गहू
अर्धाकिलाे साखर

अाॅगस्टमध्ये धान्य वाटप
साधंूच्याअंदाजानुसार प्रशासनाकडून ३४ हजार क्विंटल धान्य मंजूर असून, त्याचे वाटप अाॅगस्टच्या पहिल्या अाठवड्यापासून सुरू हाेईल. त्यासाठी सध्या साधंूकडून अर्ज भरून घेतले जात अाहेत. त्यानंतर त्यांना तात्पुरते रेशनकार्ड दिले जाणार अाहेत. रेशनकार्ड मिळाल्यानंतर अाखाड्यापर्यंत प्रशासनाच्या वतीने धान्य पुरविले जाणार अाहे. गाेरक्षनाथगाडीलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

अन्नछत्र कसे चालवायचे?
अाम्हीअन्नछत्र सुरू केले अाहे. अामचा धान्यसाठा संपत येऊनही शासनाकडून अद्याप रेशन, सिलिंडरचा पुरवठा झालेला नाही. साधूंसाठी मंजूर शिधाही अत्यल्प असल्याने त्यात अाम्ही महिना कसा काढणार, हा प्रश्न पडला अाहे. विश्वंभरदासमहाराज, व्यवस्थापक, कुंभमेळा