आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासनाचे अर्थसाह्य म्हणजे बकरीचं शेपूट : डाॅ. श्रीपाद जाेशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साहित्य संमेलनांना शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. ते म्हणजे बकरीचं शेपूट असल्याची टीका अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जाेशी यांनी केली. बकरीचे शेपूट लहान असते. धड लज्जाही राखली जात नाही अाणि माशाही हाकल्या जात नाहीत. तशीच ही मदत असल्याने त्यात वाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली असल्याचे ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

शासनाकडून साधारणत: गेल्या ३० वर्षांपासून २५ लाख रुपये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अर्थसाह्य देण्यात येेते. त्याला अनेक जण निधी म्हणतात. निधी, अनुदान अाणि अर्थसाह्य यातील फरक प्रत्येकाने समजावून घेतला पाहिजे, असेही जाेशी या वेळी म्हणाले. शासनाकडून हे अर्थसाह्य म्हणून मिळालेले असतात. ते अत्यंत कमी अाहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मी शासनाला पत्र पाठवून अर्थसाह्य तुटपुंजे अाहे, त्यात वाढ करावी, असे पत्र दिले हाेते. पण त्यावर ‘विद्यमान परिस्थितीत ते शक्य नाही’ असे उत्तर शासनाकडून अाले. अाता ही विद्यमान परिस्थिती म्हणजे किती काळ? असा प्रश्न अाहे. मी सहा महिने वाट बघणार अाहे. त्यानंतर पुन्हा शासनाकडे याचा पाठपुरावा करणार असल्याचेही जाेशींनी नमूद केले. अाता भाषा संचालक पूर्णवेळ अाहे. भाषा संचालकाचे पद रिक्त ठेवून विभाग चालवला जाताे. असे सरकारचे काम अाहे. भाषा, साहित्य अाणि संस्कृतीसाठी बजेट किती तुटपंुजे असते. ते म्हणजे टिटवीने पूर्ण समुद्र गिळायचा, असेच म्हणावेे लागले. म्हणूनच अामची मागणी ही अाहे की, शासनाने अर्थसाह्य वाढवून द्यावे. ही जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची अाहे. लाेकांचा रेटा वाढला पाहिजे.

विकासाच्या केवळ गप्पाच!
शासन विकासाच्या गाेष्टी करते; पण त्यांना रस्ते, मेट्राे इत्यादी इत्यादी विकास दिसताे. भाषा, साहित्य, संस्कृती याकडे ते विकासाची सामग्री म्हणून बघत नाहीत. म्हणूनच जिल्हा नियाेजन यंत्रणेपासूनच भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी बजेट ठेवले तर खऱ्या अर्थाने विकास हाेईल.
बातम्या आणखी आहेत...