आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साई डे स्टार’च्या तपासाबाबत पोलिसांची भूमिकाच संशयास्पद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गाेट फार्मद्वारे दाेन वर्षांत रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या साई डे स्टार मल्टिट्रेड कंपनीविरुद्ध सरकारवाडा पाेलिस ठाण्यात वर्षभरापूर्वी दाखल गुन्ह्यात गुंतवणूकदारांचे जाबजबाब पूर्ण झाले अाहेत. असे असतानाही दाेषाराेपपत्र दाखल करण्यात विलंब केला जात असल्याचा अाराेप गुंतवणूकदारांनी केला अाहे. याप्रकरणी तपासी अधिकाऱ्यासह सरकारवाडा पाेलिसांची भूमिका संशयास्पद असून, तपास अार्थिक गुन्हे शाेध पथकाकडे वर्ग करण्याची मागणी गुंतवणूकदारांनी अायुक्तांकडे केली अाहे.

साई डे स्टार मल्टिट्रेड कंपनीचे संचालक विजय नंदू वानखेडे, सीमा विजय वानखेडे (रा. पाटील लेन, काॅलेजराेड) अजय अशाेक राणे अाणि अमाेल प्रभाकर बाविस्कर (गुलमाेहर काॅलनी, ध्रुवनगर) या चाैघांविरुद्ध २०१५ मध्येच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. गाेट फार्मच्या नावाखाली वानखेडे यांनी विविध याेजना अाणून ठेवी जमा केल्या हाेत्या. २५ महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे अाणि रिसॉर्टमध्ये गुंतवणुकीचे अामिष दाखविले हाेते. या संशयितांवर सन २०१४ मध्ये अाडगाव पाेलिस ठाण्यात बनावट कागदपत्रांद्वारे जमीन खरेदी केल्याचा गुन्हा दाखल असतानाही सरकारवाडा पाेलिसांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या प्रसंगी हे प्रकरण उजेडात अाणले नसल्याचेही पत्रकात म्हटले अाहे. संशयितांनी गाेट फार्मसह धनलक्ष्मी डेलर कलेक्शन लेब्लिस रिसाॅर्ट नावाने कंपनी स्थापून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या सर्व प्रकाराची सखाेल चाैकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात अाली अाहे. गुंतवणूकदार एकनाथ नागरे, सोमनाथ नागरे, संतोष नागरे, मुकुंद रकटे, उज्ज्वला रकटे, रामदास रकटे, भिकन काशिद, डॉ. शीतल टपके, किरण दुसाने, सिद्धार्थ अहिरे, प्रकाश दुसाने, सुभाष दुसाने अादींनी तक्रार केली.

साई डे स्टार मल्टिट्रेड कंपनीच्या या प्रकरणात जिल्ह्यातील शेकडाे नागरिकांच्या सुमारे ते काेटींपर्यंतच्या ठेवी अडकलेल्या असून, त्यातून वानखेडे यांनी राज्यभरात घेतलेली मालमत्ता विक्रीचा सपाटा लावला अाहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शी आणि तातडीने व्हावा, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...