आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेंट लॉरेन्स स्कूलने पटकावला रासबिहारी क्रिकेट करंडक-२०१६

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित 'रासबिहारी क्रिकेट करंडक २०१६-१७' स्पर्धेचा सोमवारी (दि. २८) झालेला अंतिम सामना सेंट लॉरेन्स स्कूलने जिंकला. विजेतेपद सेंट लॉरेन्स, तर उपविजेतेपद रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने पटकावले.

अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रासबिहारी स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुंवरदीपक सिंह, रासबिहारी शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका बिंदू विजयकुमार आणि व्यवस्थापक निवेदिता कमोद, तसेच असोसिएशनचे सचिव समीर रकटे अादी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील अंतिम सामना सेंट लॉरेन्स आणि रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल यांच्यात झाला. ५० षटकांच्या अंतिम सामन्यात रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, माेठी धावसंख्या उभारण्यात त्यांना अपयशच अाले. रासबिहारी संघाने ५० षटकांत केवळ १३० धावांचेच लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले. सेंट लॉरेन्सने उत्तम खेळ करीत ३३.२ षटकांत गडी गमावून प्रतिस्पर्धी संघाने दिलेले हे लक्ष्य सहज गाठले. सेंट लॉरेन्स संघाचा आदित्य पांडे यास सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने उत्तम फलंदाजी करत ७२ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. सेंट लॉरेन्स संघाला क्रिकेट प्रशिक्षक सर्वेश देशमुख यांचे, तर रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंना भाविक मंकोडी यांचे मार्गदर्शन लाभले. पुरस्कार वितरण साेहळ्याचे सूत्रसंचालन प्रांजल पाटील यांनी केले. गायत्री ढिकलेने रासबिहारी शाळेची आणि क्रिकेट करंडकाची माहिती दिली. के. डी. सिंह यांनी अाभार मानले. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम‌्'ने झाली.

स्पर्धेत हे खेळाडू ठरले सर्वाेत्कृष्ट...
'रासबिहारीक्रिकेट करंडक २०१६-१७' स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार रासबिहारी इंटरनॅशनल स्कुलच्या वेदांत चांडकला, उत्कृष्ट फलंदाज सेंट लाॅरेन्सचा अादित्य पांडे, उत्कृष्ट गाेलंदाज सेंट लाॅरेन्सचा सिद्धार्थ सिंग, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशाेका युनिव्हर्सलचा यश पटेल, तर उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून शर्विन किसवे याला पुरस्कार देऊन गाैरविण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...