आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधू-महंत परतीच्या वाटेवर, साधुग्राममधील आखाडे विविध खालशांचे पॅकअप सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभपर्वाचे नाशकातील तिसरे शाहीस्नान पार पडल्यानंतर प्रमुख आखाडे खालशांनी मूळ ठिकाणाकडे परतण्यास प्रारंभ केला अाहे. परिणामी, दोन ते अडीच महिन्यांपासून साधू-महंत अाणि भाविकांच्या मांदियाळीने फुललेले साधुग्राम सुने-सुने हाेऊ लागले अाहे.
तपोवनातील ३२५ एकरात अाखाडे खालशांसाठी साधुग्राम उभारण्यात अाले आहे. त्यात वैष्णव संप्रदायातील दिगंबर, निर्वाणी निर्माेही या प्रमुख अनी आखाड्यांसह ६५० हून अधिक खालशांच्या साधू-महंतांनी मुक्काम केला. तिसऱ्या शाहीपर्वणीपर्यंत या अाखाडे खालशांमध्ये सत्संग, श्रीमद् भागवत कथा, प्रवचन अादी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नछत्रांसारखे उपक्रम राबविण्यात अाले. त्यात सहभागी भाविकांमुळे या भागात लाेकाेत्सवाची वातावरणनिर्मिती झाली हाेती.
कुंभपर्वातील तिसरे शाहीस्नान झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी आखाडे खालशांमध्ये इष्टदेवतांची विधिवत पूजा करीत साेहळा निर्विघ्न पार पडल्याबद्दल देवतांचे आभार मानण्यात आले. तेव्हापासून साधू-महंत परतीच्या प्रवासाला लागले अाहेत. तत्पूर्वी बंदाेबस्तावरील पाेलिस प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करून सहकार्याबद्दल अाभार मानले जात अाहेत.

किराणा,धान्य, साहित्य भरण्याची लगबग
अन्नछत्रासाठीअाखाडे खालशांनी मोठ्या प्रमाणावर धान्य, किराणा आदी साहित्य आणले होते. तिसऱ्या शाहीस्नानाबराेबरच अन्नदानाच्या उपक्रमाचीदेखील सांगता झाल्याने सदरचे साहित्य भरण्यातच साधू शनिवारी व्यस्त हाेते. येत्या दाेन दिवसांत एक प्रकारचे संपूर्ण बिऱ्हाड हललेले असेल.

प्रमुख महंत दोन दिवसांत जाणार
जगद््गुरूहंसदेवाचार्य, नरेंद्राचार्य महाराज, तेराभाई त्यागीचे ओमदास, इंदोर डाकाेर खालसाचे माधवाचार्यांसह अनेक महंत, महामंडलेश्वर, साधू-महंत रवाना झाले आहेत. येत्या दोन दिवसांत इतर प्रमुख आखाड्यांचे महंतही अापला मुक्काम मूळ ठिकाणी हलवणार अाहेत.

उज्जैन कुंभ में आना
नाशिकपाठाेपाठअाता अागामी वर्षी उज्जैनमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यादृष्टीने अाता अाखाड्याचे नियाेजन सुरू झाले अाहे. साधुग्राम साेडण्यापूर्वी सर्वच साधू-महंतांनी भक्त परिवाराला आशीर्वाद देत ‘उज्जैन के कुंभ में भी आना’ असे अावर्जून सांगत अाहेत. महंतांकडून भाविकांना बिदाईचेही वाटप झाले.

साधारण दाेन महिने धार्मिक कार्यक्रमांचे केंद्र ठरलेलेे अाखाडे खालशांतील मंडप काढण्यास सुरुवात झाली अाहे.

दिगंबर आखाड्यात सांगता सोहळ्यात इष्टदेवतांची पूजा
शुक्रवारीदिगंबर आखाड्यात इष्टदेवतांची विधिवत पूजा झाली. शनिवारी सकाळी सहा वाजता आखाड्यातील ध्वजाचीही पूजा हाेऊन ध्वज खाली उतरविण्यात आला. त्याचप्रमाणे आखाड्याच्या निशाणांना पेटीत ठेवून प्रमुख महंतांबरोबरच त्यांचीही रवानगी करण्यात येणार आहे. मूळ ठिकाणी गेल्यावर प्रत्येक मंगळवारी या निशाणाची पूजा हाेईल. प्रत्येक कुंभपर्वात याच निशाणांना स्नानासाठी नेले जाते, असे आखाड्याचे पुजारी सीतारामशरण महाराज यांनी सांगितले.