आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखांचा भक्तमेळा; वेगवेगळ्या वेळेत विविध भाषांमध्ये प्रार्थनासभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नाशिक-पुणे मार्गावरील सेंट झेव्हियर्स हायस्कूलजवळील बाळ येशू प्रार्थना मंदिरात दोनदिवसीय यात्रोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. या यात्रोत्सवामध्ये देशभरातील सुमारे दीड लाख भाविक सहभागी झाले आहेत.

श्र द्धा, विश्वास ठेवल्यास कठीण स्थितीतही प्रभू येशू मदतीसाठी धावून येतो, असा संदेश फादर ऑबी मस्करेन्हास यांनी सेंट झेव्हियरच्या पटांगणावर उद्घाटनाच्या पहिल्या प्रार्थना (मिस्सा) सभेत दिला.

त्यानंतर बाळ येशूच्या पवित्र सणाचा मराठीत मिस्सा (प्रार्थना) सकाळी 7, दुपारी 12 व सायंकाळी 6, तर तामिळी भाषेत दुपारी 4 व उर्वरित वेळेत इंग्रजी भाषेत फादर रुडी फर्नांडीस, फादर जोकीन टेलिस, फादर वार्लिन वेझ, फादर जो परेरा, फादर सॅँड्रिक रिबोलो आदींनी संदेश दिला. प्रभू आमच्या मनोकामना पूर्ण कर, आयुष्यात कळत-नकळत झालेल्या चुकांची क्षमा कर, परमेश्वरावरील र्शद्धा बळकट कर अशी प्रार्थना केली. सकाळपासूनच उपनगर, नेहरूनगर, शिखरेवाडी, जयभवानीरोड परिसर गर्दीने फुलला होता.

सुरक्षेसाठी खासगी सुरक्षेसह उपनगर पोलिस ठाण्यातर्फे वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता. वाहतूक शाखेचे प्रमुख संजीव ठाकूर नियंत्रण ठेवून होते. यात्रात्सोव यशस्वीतेसाठी मुख्य धर्मगुरू फादर ऑब्री मस्करेन्हास, फादर ज्युलियस मस्करेन्हास, फादर रुडी फर्नाडीस, संजय मकासरे आदींसह भाविकांनी विशेष पर्शिम घेतले.