आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांची वेतनबंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘सर्वच समस्यांना उत्तर’ अशी अाश्वासक भूमिका घेणाऱ्या अायुक्त अभिषेक कृष्णा यांची वक्र नजर अाता ठेकेदारांचे लाड पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांकडे वळली असून, त्याचाच एका भाग म्हणून खत प्रकल्पावर दगड-विटा-माती टाकून कचऱ्यातून साेने कमवणाऱ्या ठेकेदारांना अप्रत्यक्षपणे संरक्षण मिळण्याजाेगी परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी चार अधिकाऱ्यांचे वेतन राेखण्याची कारवाई करण्यात अाली अाहे. या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे अाॅटाे वे ब्रिजसारख्या अाधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विलंब केल्यामुळे ही कारवाई केल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.

दिलेल्या मुदतीत काम मार्गी लागले नाही म्हणून अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी अाणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. बनकर यांच्यावर कारवाई झाली अाहे. महापालिकेत गेल्या काही वर्षांत अधिकारी ठेकेदारांचे लागेबांधे अनेक घटनांतून नगरसेवकांनी उघडकीस अाणले. मात्र, काेणावरही ठाेस कारवाई झाली नव्हती. सिंहस्थ कुंभमेळ्यात, तसेच अाराेग्य विभागातील ठेके देताना ही युती अनेकवेळा अधाेरेखितही झाली हाेती. दरम्यान, घंटागाडीसारख्या वादग्रस्त निविदेचा तिढा साेडवताना अायुक्तांनी ठेकेदारांना सहजासहजी घाेटाळा करता येणार नाही, अशी तजवीज करून ठेवली.
घंटागाडीतून कचऱ्याचे जादा वजन दाखवून पैसे कमवण्यासाठी दगड, मातीचा वापर हाेत असल्याचे यापूर्वी उघड झाले हाेते. १७६ काेटींचा ठेका असल्यामुळे ठेकेदार पुन्हा जादा वजनासाठी हीच क्लृप्ती वापरण्याची भीती हाेती. या पार्श्वभूमीवर अायुक्तांनी घंटागाडीचा कचरा ज्या खत प्रकल्पावर येताे, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला हाेता. एवढेच नव्हे तर, अाॅटाे वे ब्रिजसारखा अाधुनिक वजनकाटा बसवून त्यावर कचरा उतरण्यापूर्वी वजन घेण्याची शक्कलही लढवली गेली हाेती. मात्र, महापालिकेसाठी पाेषक या यंत्रणा सुरू करण्यात अधिकाऱ्यांकडून विलंब झाला. त्यामुळे अायुक्तांनी अाक्रमक भूमिका घेत त्यांचे वेतनच राेखण्याचे अादेश दिले अाहेत.

जानेवारीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती
कचऱ्यापासूनवीजनिर्मिती करण्याच्या खत प्रकल्पातील जर्मन सरकारच्या जीअायझेडच्या प्रकल्पाची जानेवारीपासून सुरुवात हाेणार असल्याचे अायुक्तांनी सांगितले. याबराेबरच, खत प्रकल्पात इंधन विटा तयार करण्याचे युनिटही डिसेंबरमध्ये कार्यान्वित हाेईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...