आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वापरलेल्या मिनरल बॉटलची पुन्हा विक्री, रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याला धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रेल्वेस्थानक तसेच गाड्यांमध्ये ठरावीक कंपनीच्या बाटलीबंद पाण्यालाच परवानगी असताना लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये बनावट आणि कमी शुद्धतेच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रासपणे विक्री होत आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानकात अशा बाटल्या विकणारी लहान मुले दिसत असून, प्रवाशांनी पाणी पिऊन फेकलेल्या मिनरल पाण्याच्या बाटल्या गोळा करून आणतात. त्या पुन्हा भरून प्रवाशांना विकतात. त्यामुळे हे पाणी पिण्यात आल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रेल्वेतील फेरीवाले सीलबंद बाटल्या विक्रीसाठी आणत असतात. या पाणी बाटल्या विक्रीसाठी रेल्वे प्रशासनाची मंजुरी आहे. मात्र, कमी दर्जाच्या आणि असुरक्षित पाण्याची विक्री करण्याची कोणालाही परवानगी नसताना हा सर्व प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. स्थानिक पातळीवर नळाचे पाणी भरून तयार केलेल्या या बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न असून, त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यालाही अपाय संभवतो.
आयआरसीटीसीने रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्ये नऊ ठरावीक ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीस परवानगी दिलेली असतानाच नाशिकरोड येथील रेल्वेचे अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत.
बनावट पाण्याचे अर्थकारण
रेल्वेस्थानकातील रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्यांच्यामध्ये पाणी भरणाऱ्या मुलांची एक टोळी कार्यरत आहे. ही मुले जरी पोटाची खळगी भरण्यासाठी हे काम करतात, मात्र हे नियमबाह्य आणि आरोग्यास घातक काम असल्याने त्याचे समर्थन तर नक्कीच कोणी करू शकणार नाही. अशा बाटल्यांची ते १० रुपयांपर्यंत विक्री केली जाते.
रेल्वे प्रबंधकांनी बोलणे टाळले
परवानगी नसतानाही वापरलेल्या रिकाम्या मिनरल बाटल्यांमध्ये पुन्हा पाणी भरून त्याची विक्री केली जात असल्याचे नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एम. बी. सक्सेना यांना सांगितले असता, त्यांनी ‘कारवाई करू’ अथवा ‘यात लक्ष घालू’ असे सांगता विचारलेल्या प्रश्नाकडे थेट दुर्लक्ष करीत बोलणे टाळले.
बातम्या आणखी आहेत...