आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan News In Marathi, Salman Opening Water Sport Center At Nashik, Divya Marathi

‘सल्लू आला रे’... राष्ट्रवादीची दबंगगिरी अन् सलमानची कमिटमेंटही भारी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रणरणत्या उन्हात तब्बल तीन तास लाडक्या सल्लूभाईची वाट पाहणार्‍या तरुणाईचे लक्ष कधी आकाशाकडे, कधी पाण्याकडे.. ‘सल्लू आला रे’, अशी हाळी कोणी देताच आवाजाच्या दिशेने पोहोचण्याची धडपड.. घड्याळाचे काटे बरोबर 4 वाजून 19 मिनिटांवर स्थिरावतात आणि दबंग सलमान खान व रांगडा सुनील शेट्टी यांचे आगमन होते.. त्यानंतर बेभान झालेली तरुणाई तब्बल पाऊण तास या जोडीच्या मागे जिवाची पर्वा न करता धावाधाव करते..

गंगापूर धरणावरील वॉटरस्पोर्ट्स अँक्टिव्हिटी सेंटरच्या उद्घाटनासाठी आलेल्या सलमान व सुनीलला पाहण्यासाठी सकाळपासून तरुणांबरोबरच महिलांची गर्दी झाली होती. कार्यक्रमस्थळी दोघांचे खासदार समीर भुजबळ यांच्या वाहनातून आगमन झाल्यानंतर प्रचंड जल्लोष झाला. सुरक्षारक्षक व पोलिसांचे कडे तोडून त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडाच पडला. त्यातून कशीबशी वाट काढत त्यांना सेंटरकडे नेण्यात आले. येथे सलमान व सुनीलसह भुजबळ यांनी नौकानयनाचा आनंद घेतला. 20 मिनिटांच्या छोटेखानी कार्यक्रमात दोघांनी चार मिनिटांत भाषण आटोपले. प्रास्ताविकात खासदार भुजबळ यांनी विकासकामांची माहिती दिली. दोन्ही कलावंतांना ‘विकासवारी’ची प्रतही भेट देण्यात आली.

सिर्फ तीन लोगोंसे कहो.. दुनिया बदल जायेगी : काळ्या रंगाच्या बॉडीफिट टी-शर्टमधील सलमानने मराठीत नमस्कार करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. पुढे तो हिंदीत म्हणाला, ‘पिछली बार जब समीर के कॅम्पेन के लिए आया तो आपने मेरा मान रखते हुए उसको अच्छी वोटो से जिताया, इसलिए आपका शुक्रिया। समीरने भी मेरा मान रखते हुए जो डेव्हलपमेंट की कमिटमेंट दी वो पूरी की। आज फिर एक बार समीर के लिए खडा हूँ। जो मैने कहा, वो तीन लोगों को बोलो। फिर वो तीन और तीन लोगों को बोलेंगे, इस तरह पूरी दुनिया में विकास की बात चली जाएगी। ठीक है, तो चलूँ मै? अगर आप मदत करें, तो मैं मुंबई तक पहुंच पाऊंगा और अगर पहुंच गया तोही अगली बार आऊंगा। बरोबर ना? चला भेटू या परत’, असा मराठीत समारोप करीत सलमानने निरोप घेतला.

पुढील स्‍लाइडवर वाचा, सलमानची कमिटमेंट