आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कौटुंबिक कायदे बदलण्याची खरेच वेळ आली आहे का? विधी आयोगाने मागितली लाेकांची मते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - समान नागरी कायद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? विवाह, घटस्फोट, दत्तकविधान, वारसा हक्क हे सारे एकाच कायद्याअंतर्गत आले तर त्याचा फायदा होईल का? समान नागरी कायद्यामुळे समानता येईल का? हा कायदा सक्तीचा असावा की एेच्छिक? कौटुंबिक कायद्यांचे पुनर्विलोकन करण्याची गरज वाटते का? गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले हे प्रश्न आता देशाच्या विधी आयोगाने लोकांनाच विचारले आहेत.

विधी आयोगाचे अध्यक्ष न्या. बलवीरसिंह चौहान यांनी नुकतेच नागरिकांना एक आवाहन केले आहे. प्रश्नावली रुपात या आवाहनाद्वारे समान नागरी कायद्याबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया, मते आणि सूचना विधी आयोगाने मागवल्या आहेत. ‘समान नागरी कायद्याबाबत सर्व प्रकारच्या सूचना सहभागी व्हाव्यात या उद्देशाने आम्ही हे आवाहन करत आहोत,’ अशी भूमिका आयोगाने यात स्पष्ट केली आहे. ‘समान नागरी कायद्यावर सांगोपांग विचार चर्चा व्हावी, विविध धर्मांमधील कौटुंबिक कायद्यांमधील विविधता पुढे यावी, या कायद्यांच्या पवित्रतेपलीकडे जाऊन सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून चर्चा व्हावी,’ हा उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या प्रश्नांवर नाेंदवा अापली मते...
कौटुंबिक कायद्यांमध्ये सुधारणा हवी का, समान नागरी कायद्याने लिंग समानता रुजेल का, हा कायदा सक्तीचा असावा की एेच्छिक, यामुळे पोटगीचे प्रश्न सुटतील का, तलाकची पद्धत बदलण्याची गरज आहे का, घटस्फोटासाठी वर्षे प्रतीक्षेचा कालावधी ख्रिश्चन महिलांच्या अधिकारावर गदा आणतो का, घटस्फोटासाठीचे निकष सर्व धर्मीयांना समान असावेत का, असे प्रश्न यात आहेत.
बातम्या आणखी आहेत...