आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल: संभाजी भगत, महेश काेठारे, शेषराव मोरे अाजचे अाकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये दुसऱ्या दिवसाचे अाकर्षण अाहेत ते म्हणजे लाेकशाहीर संभाजी भगत, अभिनेते, निर्माते महेश काेठारे, शीला रेड्डी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव माेरे, राजीव डाेग्रा अाणि इतर अनेक मान्यवर यासह दिवसभरात राज्यातील प्रसिद्ध डाॅक्टरांचा साहित्यविषयक एक विशेष परिसंवाद हाेणार अाहे. त्याचबराेबर शहरातील कलावंत काव्याभिनयातून कुसुमाग्रजांना वंदन करणार अाहेत. यासह गीतकार मंगेश कांगणे यांच्याशी गप्पा, चिमुकल्यांचे साहित्यसंमेलन अाणि वाचू अानंदे विशेष कार्यशाळा हाेणार अाहे. असा भरगच्च कार्यक्रम नाशिककरांसाठी एक मेजवानीच ठरणार अाहे.
 
संभाजी भगत
हातातल्या डफलीवरची एक थाप आणि रसिकांवर गारुड करणारी जोमदार हाक... आपल्या शाहिरीने सामाजिक विसंगतींवर घाव करणारे लोकशाहीर संभाजी भगत. विद्रोही कवी म्हणून गाजलेल्या भगतांचे नाव कोर्ट, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकांच्या रूपात मराठी मनावर बिंबले. त्यांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला राष्ट्रपतींच्या सुवर्णकमळाने सन्मानित करण्यात आले. तर, ‘शिवाजी अंडरग्राउंड’ची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या महोत्सवात झाली. शाहिरी जलसा हे भगत यांचे वैशिष्य. ‘तोड ही चाकोरी’ या त्यांच्या गाण्यांनी अनेक कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये चेतना निर्माण केली. उंदीर, गिरणीचा वग ही त्यांची वगनाट्ये, ‘अडगळ’ हे नाटक तर ‘कातळाखालचे पाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांच्याशी लाेकेश शेवडे संवाद साधणार अाहेत.
 
प्रा. शेषराव मोरे
काश्मीर : एक शापित नंदनवन, मुस्लिम मनाचा शोध, सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद या ग्रंथांचे लेखक ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे. धर्म आणि राजकारण हे मोरे सरांच्या अभ्यास, चिंतन आणि लेखनाचा विषय. इतिहासाचे संशोधन, अभ्यासपूर्ण मांडणी हे वैशिष्ट्य.  प्रा. बालाजी चिरडे त्यांच्याशी संवाद साधतील.
 
‘कुसुमाग्रज कॅलिडोस्कोप’
ज्ञानपीठ विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर, अर्थात कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये हा साहित्याचा महाेत्सव होत आहे. म्हणूनच, नाशिकमधील प्रसिद्ध नाट्यअभिनेते शनिवारी (दि. ४) सादर करणार आहेत, कुसुमाग्रज कॅलिडोस्कोप. यात सहभागी होणार आहेत, नाशिकमधील प्रसिद्ध रंगकर्मी सदानंद जोशी, सचिन शिंदे, प्राजक्त देशमुख, हेमा जोशी आणि श्रीपाद देशपांडे. हे कलाकार काव्याभिनयातून कविवर्य कुसुमाग्रज यांना वंदन करणार अाहेत.
 
पुढील स्‍लाइडवर...हरिहरन यांचा म्युझिक काॅन्सर्ट, संजय भास्कर जाेशी, महेश कोठारे, नीलिमा कोठारे यांचेही अाकर्षण...
 
शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा, शनिवारी होणारे कार्यक्रम असे...
बातम्या आणखी आहेत...