आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार भुजबळांकडून पोलिसांची झाडाझडती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - देवळाली गावात भरवस्तीत सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर खासदार समीर भुजबळ यांनी पोलिस अधिका-यांची झाडाझडती घेतली. निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यावर त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला; मात्र एकाही प्रश्नाचे उत्तर अधिका-यांना देता आले नाही.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा करून नागरी वस्तीत केल्या जाणा-या या अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल भुजबळ यांनी केला. स्थानिक रहिवासी गप्प आहेत, म्हणजे त्यांचीही यास संमती असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
हा परिसर ज्यांच्या हद्दीत आहे, ते वरिष्ठ अधिकारी इकडे फिरकलेलेही दिसत नाही, असे खडसावून ‘गस्त पथक काय करते’, असा सवाल केला. स्थानिक रहिवाशांनी या व्यवसायाची माहिती न दिल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे भुजबळ यांनी आदेश दिले.
राजकीय नेत्यांची भेट - स्फोटाच्या ठिकाणी महापौर नयना घोलप, आमदार वसंत गिते, सचिन ठाकरे, आर. डी. धोंगडे, दत्ता गायकवाड, अस्लम मनियार, सूर्यकांत लवटे, सुधाकर जाधव, कैलास मोरे, रविकिरण घोलप, रईस शेख, गजानन शेलार, अशोक पाटील मोगल, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, बाळासाहेब मते आदींनी भेट दिली.