आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी प्रकल्प रद्द करणे सरकारला भाग पाडू; राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवारांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघर्षयात्रेच्या शिवडे येथील सभेच्या व्यासपीठावर गळफासाचा दाेर अडकवण्यात अाला हाेता. - Divya Marathi
संघर्षयात्रेच्या शिवडे येथील सभेच्या व्यासपीठावर गळफासाचा दाेर अडकवण्यात अाला हाेता.
सिन्नर - ‘समृद्धी महामार्गासाठी बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेता येणार नाहीत. शासनाच्या विराेधात शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी असून जनमताचा अादर करून सरकारने हा प्रकल्प रद्द करावा, अन्यथा त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून सरकारला ताे रद्द करण्यास भाग पाडू,’ असा इशारा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शिवडे (ता. सिन्नर) येथे अायाेजित सभेत  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सरकारला दिला.
 
या सभेच्या या मंचावर लटकवलेला दोरीचा फास आणि प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात अाला. लक्ष्मण वाघ या शेतकऱ्याने तर विषाची बाटली दाखवून भूसंपादनासाठी अधिकारी अाल्यास अात्महत्येचा इशाराच दिला.   
 
अजित पवार म्हणाले, ‘पोलिसांनी शेतकऱ्यांना कायद्याचा धाक दाखवू नये. येथून पुढे शेतकऱ्यांचा केसही कुणी वाकडा करणार नाही. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात. त्यामुळे पळता भुई करून टाकली जाईल’, असा सज्जड दमही त्यांनी भरला.  दरम्यान, सभा संपताच शेतकऱ्यांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली व गावाबाहेर नेऊन प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

भाजप- राष्ट्रवादी अाघाडीच्या प्रश्नावरून भडकले पवार
‘भाजप सरकारवर टीकेची झाेड उठवणारे राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषदेतील सत्तेत मात्र त्यांच्यासाेबत कसे सहभागी हाेतात?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी चांगलेच भडकले.  ‘स्थानिक प्रश्न व संघर्ष यात्रेचा संबंध नाही. शेतकऱ्यांसाठी कितीही अामदारक्या अाेवाळून टाकू?’ असे त्यांनी पत्रकारांना सुनावले. तसेच ‘माझाच शब्द फायनल’ असे सांगत विषयच गुंडाळला. केवळ राष्ट्रवादीनेच नव्हे तर काँग्रेसनेही शिवसेनेबराेबर युती केल्याचा उपप्रश्न असल्यामुळे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही पवारांच्या मदतीला धावले. ‘स्थानिक अाघाडी व संघर्ष यात्रेचा संबंध जाेडू नये,’ असे अावाहन त्यांनी केले.

संघर्षयात्रेच्या शिवडे येथील सभेच्या व्यासपीठावर गळफासाचा दाेर अडकवण्यात अाला हाेता. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा संदेश यातून देण्यात अाला.  ताे दाेर पाहून ‘गळफास तुम्ही न घेता सरकारला द्या’ असे अावाहन अजित पवार यांनी केले.
 
बातम्या आणखी आहेत...