आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांमध्ये आजपासून होणार स्वच्छतेचा जागर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शाळांमध्येस्वच्छता असावी, तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या आरोग्याकडे लक्ष असावे, या उद्देशाने केंद्र सरकारकडून दि. १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान शाळांमध्ये ‘बालस्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. १४) शाळांमध्ये बालदिनानिमित्त ‘स्वच्छ शाळा स्वच्छ अंगणवाडीदिन’ साजरा होणार आहे.

देशभरातील शाळांमध्ये १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान ‘बालस्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यासाठी राज्य शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी प्रशासन अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी यांना मोहिमेच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक पाठविण्यात आले आहे. शहरात ११ नोव्हेंबरला देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिकारी किरण कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांमध्ये या ‘बालस्वच्छता मोहिमे’ची सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी बालदिनानिमित्त ‘स्वच्छ शाळा स्वच्छ अंगणवाडीदिन’ साजरा करून ‘बालस्वच्छता मोहीम’ सप्ताहाचीही सुरुवात होणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून २०१९ पर्यंत स्वच्छ भारत करण्याचे ध्येय आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ याच मोहिमेंतर्गत शाळांमध्येही स्वच्छता व्हावी, म्हणून ‘बालस्वच्छता मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासह शहरातील सर्व शाळांचा समावेश असणार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना आरोग्य जनजागृतीसाठी बॅनर तयार करण्यात येणार आहे. सप्ताहांतर्गत शाळेत विविध स्पर्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील करण्यात येणार आहे.

* १४ नोव्हेंबरला स्वच्छ शाळा स्वच्छ अंगणवाडी दिवस साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी महापालिकेच्या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
* १५ नोव्हेंबरला स्वच्छ शाळा परिसरदिन साजरा होणार आहे. याच दिवशी माता मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विद्यार्थ्यांना पालकांना आरोग्याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
* १७ नोव्हेंबरला वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ अन्न बाल आरोग्यदिन साजरा होणार आहे. शाळांमध्ये निबंध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
* १८ नोव्हेंबरला स्वच्छ पिण्याचे पाणी, संतुलित आहाराबाबत विद्यार्थ्यांना विशेष माहिती देण्यात येणार आहे.
* १९ नोव्हेंबर स्वच्छ शौचालय शिक्षण जीवनदिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी किरण कुवर यांनी दिली आहे.