आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता सर्वेक्षणासाठी पालिकेचे वरातीमागून घाेडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियानाला ‘हात की सफाई’ दाखवण्याचे प्रकार सुरूच असून, महापालिकेच्या अाराेग्य विभागाला जानेवारीपासून सुरू हाेणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या प्रसिद्धीसाठी जानेवारीचा म्हणजेच तब्बल पाच दिवस विलंबानंतरचा मुहूर्त सापडला अाहे. 
 
यापूर्वी स्वच्छता माेहिमेत नाशिकमध्ये नसलेला समुद्र दाखवून तेथील सफाई करून दाखवल्याचा प्रताप करणाऱ्या अाराेग्य विभागाने यंदा खाेटी प्रसिद्धी मिळवण्यासाठीही धडपड केल्यामुळे उदासीनपणाबाबत टीका हाेत अाहे. 

अाराेग्य विभाग अनेक दिवसांपासून वादात असून, अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई हाेत नसल्यामुळे अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. या विभागाला काेट्यवधी रुपयांच्या घंटागाडी, श्वान निर्बीजीकरण, पेस्ट कंट्राेल अशाच कामात रस असल्याचे स्पष्ट झाले असून, या कामासाठी रात्रीचा दिवस करण्यापर्यंतची धडपड दाखवली जात अाहे. मात्र, शासनाच्या महत्त्वाकांक्षी याेजनांना केराची टाेपली दाखवण्यापर्यंत मजल गेल्यामुळे अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. 
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा अाढावा घेण्यास सुरुवात झाली अाहे. त्यात शाैचालये नसलेल्या लाभार्थ्यांना वैयक्तिक शाैचालयाचा लाभ दिला अाहे का अजून लाभार्थ्यांना निधी देणे बाकी अाहे. तसेच, उघड्यावर शाैचास बसू नये इतरांनाही बसू देऊ नये, अाेला सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत टाकण्याबाबत जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान स्वच्छता सर्वेक्षण हाेणार अाहे. याबाबत नागरिकांची भेट घेऊन केंद्रीय समिती प्रश्न विचारणार अाहे. दरम्यान, जानेवारीला सुरू हाेणाऱ्या माेहिमेबाबत शहरात काही ठिकाणी नावापुरते हाेर्डिंग्ज लावण्यात अालेे. मात्र, प्रसारमाध्यमातून माेफत मिळणारी प्रसिद्धी घेण्यासाठी अाराेग्य विभागाला जानेवारीचा मुहूर्त मिळाला अाहे. यापूर्वी स्वच्छता अभियानात चक्क समुद्राजवळ सफाई केल्याचे छायाचित्र अाराेग्य विभागाने माध्यमांना दिले हाेते. त्यामुळे अशा माेहिमांबाबत अाराेग्य विभागाचा निरुत्साह अधाेरेखित हाेत अाहे. 

..हे प्रश्न विचारणार 
अापल्या भागात घंटागाडी येते का? 
अापण कचरा घंटागाडीत टाकतात का? 
घरात वैयक्तिक शाैचालय अाहे का? 
घराजवळ सामुदायिक वैयक्तिक शाैचालय स्वच्छ अाहे का? अापल्या घराजवळील परिसर स्वच्छ अाहे का?